मुंबई पोलीस आयुक्तांनाच ऑनलाईन फसविण्याचा प्रयत्न

१९ वर्षीय तरुणाला बेड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची आर्थिक फसवणूक करण्याचा एका तरुणाचा डाव फसला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पोलीस आयुक्त संजय बर्वे हे एसबीचे प्रमुख असताना त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता.

आशिषकुमार झा असे तरुणाचे नाव आहे. मात्र, याबाबत संजय बर्वे यांनी कोणतीही माहिती देण्यास टाळले आहे. तर आशिषकुमार झा यांच्या वकीलांनीही पोलिसांचा दावा फेटाळून लावला आहे.

आशिषकुमार झा हा मुळचा छत्तीसगडचा आहे. दोन वर्षांपुर्वी संजय बर्वे हे राज्याच्या अन्टी करप्शन विभागाचे प्रमुख असताना ११ जूलै २०१७ रोजी त्यांना फोन केला. फोनवरील व्यक्तीने स्टेट बँकेतील अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. त्यांचे क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याची माहिती सांगून अनब्लॉक करण्यासाठी कार्डवरील १६ अंकी क्रमांक व पीन क्रमांकासह सीसीव्ही क्रमांक मागितला. त्यानंतर संजय बर्वे यांना अशा प्रकारच्या फसवणूकीची माहिती असल्याने त्यांनी तपशील दिले नाहीत. त्यानंतर त्यांन याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. फसवणूकीचा प्रयत्न झाल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षांनी पोलिसांनी झा याला झारखंडमधून अटक केली. तो ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, त्याच्या वकीलांनी हा दावा फेटाळून लावला. त्याने एक सेकंड हॅंड मोबाईल खरेदी केला होता. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीने मोबाईल फोनचा वापर केल्यानंतर तो विकला असा दावा केला आहे.