सायबर सेलच्या पोलीस अधिकाऱ्याने मॉडेलला ब्लॅकमेल करुन केला बलात्कार

चंदीगढ :  वृत्तसंस्था – मुंबई येथील एक मॉडेलला तरुण ब्लॅकमेल करत होता. याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या मॉडेललाच ब्लॅकमेल करुन पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनमुळे खळबळ उडाली असून सध्या हा अधिकारी फरार आहे. ही घटना चंदीगढ येथे घडली आहे. चंदीगढ पोलीस खात्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने तक्रार देण्यासाठी गेलेल्या  मॉडेलला तिचे अश्लिल फोटो दाखवून ब्लॅकमेल करुन बलात्कार केला.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, मुंबईतल्या एका मॉडेलने गेल्या वर्षी चंदीगढमध्ये एका तरुणाची तक्रार केली होती. हा तरुण तिचा ओळखीचा असून त्यांच्यात चांगली मैत्री होती. या तरुणाच्या हाती मॉडेलचे काही आक्षेपार्ह छायाचित्र लागले. ही छायाचित्रे दाखवून तो तरुण तिला ब्लॅकमेल करत होता. आधी या तरुणाने मॉडेलकडून पैसे उकळले. नंतर या तरुणाने मॉडेलकडे शरीरसुखाची मागणी केली. तेव्हा घाबरलेल्या तरुणीने चंदीगढ मध्ये पोलिसांत तक्रार केली.

‘महाकरोडपती’ च्या बक्षीसाच्या अमिषाने महिलेची लाखांची फसवणूक

सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक नवीन फोगाटने याप्रकरणी तपास करून तरुणाला अटक केली. नंतर या तरुणाची ओळख पटवण्यासाठी मॉडेलला चंदीगढला बोलावले. त्यानुसार मॉडेल चंदीगढला दाखल झाली आणि आरोपीची ओळख पटवली. नंतर मॉडेल आपल्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघाली. तेव्हा रस्त्यात पोलीस उपनिरीक्षक नवीन फोगाटने आरोपीकडील मॉडेलची आक्षेपार्ह छायाचित्र दाखवून ड्रिंक घेण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर मॉडेल घाबरली आणि पोलिसाने सांगितले तसे केले. नंतर पोलिसाने हॉटेलच्या एका खोलीत मॉडेलवर बलात्कार केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली.

नंतर मॉडेल मुंबईत परतली आणि याबाबत कुणालाच नाही सांगितले. पण एका लाचखोरीप्रकरणी नवीन फोगाटला निलंबीत करण्यात आले. ही बाब मॉडेलला कळाली तेव्हा तिने पोलिसांत फोगाट विरोधात तक्रार केली. नवीन फोगाट सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.