धक्कादायक ! तब्बल 3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात

पोलिसनामा ऑनलाईन – सायबर गुन्हेगारांनी तब्बल 3 कोटी भारतीयांची खासगी माहिती चोरुन डार्क वेबवर अपलोड केली आहे. ऑनलाईन इंटेलिजेंस कंपनी साइबलने डेटा लीक संदर्भात धक्कादायक माहिती दिली आहे. ’नोकरीच्या शोधात असलेल्या 2.91 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. बर्‍याच नागरिकांची वैयक्तिक माहिती यामध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये शिक्षण, पत्ता, ईमेल, फोन, पात्रता, कामाचा अनुभव इत्यादी गोष्टी आहेत.

फेसबुक आणि अ‍ॅकॅडमीच्या हॅकिंगची माहिती सायबलने नुकतीच उघड केली होती. त्यानुसार सायबर गुन्हेगार अशा वैयक्तिक माहिती गोळा करत करतात. जेणेकरुन ते त्यांच्या नावाची ओळख चोरी, घोटाळा किंवा हेरगिरी यासारख्या गोष्टी करू शकतात. महिन्याच्या सुरूवातीला, सर्वात मोठे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म अनएकाडेमी हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यावेळी यूएस-आधारित सुरक्षा कंपनी सायबलने देखील याची नोंद केली होती, त्यानुसार हॅकर्सने सर्व्हर हॅक करून 22 दशलक्ष विद्यार्थ्यांची माहिती चोरली होती. डार्क वेबवर माहितीचा तपशील ऑनलाईन विकला जात आहे. विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंट, गुगल, आणि फेसबुक मधील कर्मचार्यांचा तपशील होता