Cyber Crime | सावधान ! तुमच्या फोनवर एखादी लिंक आली आहे का? हॅक होऊ शकतो मोबाइल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  Cyber Crime | दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम (Cyber Crime) युनिटने विशेष प्रकारचे अ‍ॅप आणि एका सॉफ्टवेयरच्या मदतीने व्हॉट्सअप (Whatsapp) हॅक करून फसवणार्‍या गँगचा पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी या प्रकरणात नायजेरियन नागरिकांना अटक केले आहे. चिमेलुम इमॅनुअल एनिव्हेटालु उर्फ मॉरिस डेगरी (33) अशी आरोपींची नावे आहेत.

 

मदत मागण्याच्या नावावर फसवणूक

 

पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप, 15 मोबाइल फोन आणि इतर सामान जप्त केले आहे.
आरोपींनी फसवणुकीसाठी एक अनोखी पद्धत काढली होती.
ते व्हॉट्सअप हॅक केल्यानंतर पीडिताच्या मोबाइलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सहभागी लोकांना आपला अकाऊंट नंबर पाठवून मदतीच्या नावावर फसवणूक (Cheating) करत होते.

 

याशिवाय अनेकदा सोशल मीडियावर मित्र बनवून तर कधी हर्बल सीड्सच्या नावावर सुद्धा फसवणुक करत होते.
त्यांच्या गँगमध्ये अनेक लोक सहभागी होते. पोलिसांच्या छापेमारीच्या वेळी ते फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आरोपी मॉरिस 2018 पासून भारतात अवैध प्रकारे राहात होता. ज्या भारतीयाच्या घरात ते राहात होते, पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध सुद्धा गुन्हा दाखल (Cyber Crime) केला आहे.

 

कॉन्टॅक्ट लिस्ट करत होते हॅक

 

सायबर क्राईम युनिटचे इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिकचे (आयएफएसओ) डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीत राहणार्‍या एका व्यक्तीने आपले व्हॉट्सअप हॅक होण्याची तक्रार सायबर क्राईम युनिटकडे केली होती.
या व्यक्तीने सांगितले की, कुणीतरी त्याचे व्हॉट्सअप हॅक केल्यानंतर त्याच्या लिस्टमधील लोकांकडे मदतीच्या नावावर पैसे मागण्यास सुरूवात केली होती. (Cyber Crime)

 

Web Title : Cyber Crime | delhi police bust whatsapp hacking syndicate accused create dedicated application for each victim

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | DA मध्ये पुन्हा झाली वाढ ! काही सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात करण्यात आली 12 टक्केपर्यंत वाढ

Amruta Fadnavis | ‘जागतिक कामांबद्दलचं ‘नोबेल’ गेलं; पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या’ – हरी नरके

Khajoor 10 Benefits In Winter | खजूरला वंडर फ्रूट का म्हणतात? जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 10 फायदे