सावधान ! ‘कोरोना’च्या संकटात अशी होतेय लोकांच्या बँक आकाउंटमधून पैशांची चोरी, जाणून घ्या

एटीएम कार्डचे क्लोनिंग – सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सांगतात की, अगोदर सामान्य कॉलद्वारे फसवणूक होत होती आता डाटा चोरी करून पैसे खात्यातून काढले जात आहेत. सायबर भामटे हायटेक होऊन कार्ड क्लोनिंग करू लागले आहेत. एटीएम कार्ड लोकांच्या खिशात असते आणि गुन्हेगार पैसे काढून घेतात. एटीएम क्लोनिंगद्वारे कार्डची पूर्ण माहिती चोरली जाते आणि डुप्लीकेट कार्ड बनवले जाते. यासाठी एटीएम वापरताना पिन दुसर्‍या हाताने लपवून टाका.

क्यूआर कोडद्वारे फसवणूक – क्यूआर म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोडद्वारे सायबर गुन्हेगार मोबाइलवर क्यूआर कोड पाठवतात आणि त्यावर क्यूआर कोड लिंकवर क्लिक केल्यास गुन्हेगार त्या व्यक्तीच्या मोबाईल फोनचा क्यूआर कोड स्कॅन करून बँक खात्यातून रक्कम काढून घेतात.

कार्डच्या डाटाची चोरी – एटीएम कार्डच्या डाटाच्या चोरीसाठी सायबर गुन्हेगार कार्ड स्कीमरचा वापर करतात. यासाठी कार्ड रीडर स्लॉटमध्ये डाटा चोरणारा डिव्हाइस लावतात. याशिवाय बनावट कि बोर्ड लावून सुद्धा डाटा चोरला जातो. दुकान किंवा पेट्रोल पंपावर जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड स्वाइप करत असाल तर लक्षात ठेवा कर्मचारी कार्ड तुमच्या नजरेपासून दूर घेऊन जाणार नाही.

नोकरीच्या नावावर ऑनलाइन फ्रॉड – अनेक जॉब पोर्टल संक्षिप्त माहिती लिहिणे, जाहीरात करणे आणि जॉब अलर्टसाठी फि घेतात, अशा पोर्टलला पैसे भरताना, वेबसाईटची प्रमाणिकता आणि खरेपणा तपासूण घ्या.

लग्न जुळवणार्‍या वेबसाइट – जर तुम्ही ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइटवर पार्टनर शोधत असाल तर सावध राहा. कारण याद्वारे सुद्धा फसवणूक होते. चॅटिंगद्वारे फ्रॉड करणारे तुमच्या बँक खात्याची माहिती मागतात आणि खात्यातील रक्कम गायब केली जाते. अशा साइटवर तुमची वैयक्तिक आणि बँकेची माहिती देऊ नका.

लॉटरी, पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावावर फसवणूक – सायबर एक्सपर्ट सांगतात की, सध्या टीव्ही प्रोग्राम कौन बनेगा करोडपतीच्या नावावर लाखो रूपयांची लॉटरी काढण्याच्या नावाखाली लोकांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. मागच्या वर्षी ऑईल मार्केटिंग कंपनीने आपल्या वेबसाइटवर पेट्रोलपंप डिलरशिपच्या नावावर फसवणूक होत असल्याची माहिती दिली होती.

व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे फसवणूक – जर व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या अनोळखी नंबरवरून व्हॉईस कॉल आला तर सावध व्हा, कारण फोन करणारा व्यक्ती तुमची फसवणूक करू शकतो. नंबर को ब्लॉक कर सकता है. फसवणूक केल्यानंतर तो तुमचा नंबर ब्लॉक करू शकतो.

युपीआयद्वारे फसवणूक – युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे कुणालाही सहज पैसे पाठवता येतात आणि मागवता येतात. युपीआयद्वारे सायबर गुन्हेगार एखाद्या व्यक्तीला डेबिट लिंक पाठवतात आणि ज्यावेळी व्यक्ती त्या लिंकवर क्लिक करून आपला पिन टाकतो, त्याच्या खात्यातून पैसे जातात. यापासून वाचण्यासाठी अनोळखी डेबिट रिक्वेस्ट ताबडतोब डिलिट करा.

बँक खात्याच्या चौकशीच्या नावाखाली फसवणूक – सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सांगतात की, बँक खात्याची तपासणी सतत करत राहिले पाहिजे आणि अस्वीकृत व्यवहारांची बँकेला माहिती दिली पाहिजे.

ई-मेल स्पूफिंग – ई-मेल स्पूफिंगद्वारे फसवणूक करणारे असा ईमेल आयडी बनवतात जो प्रसिद्ध कंपनी किंवा बँकेशी मिळता जुळता असतो आणि नंतर सर्वे फॉर्मद्वारे लोकांना आकर्षित करून डाटा चोरी करतात. गुगल सर्चद्वारे सुद्धा फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. सायबर गुन्हेगार सर्च इंजिनमध्ये जाऊन मिळती-जुळती वेबसाइट तयार करून आपला नंबर टाकतात आणि जर कुणी सर्च इंजिनवर काही खास गोष्ट शोधत असेल तर ती बनावट वेबसाईट सुद्धा येते.