सावधान ! आता ‘भीम’, ‘पेटीएम’ व ‘गूगल पे’ देखील राहिले नाही ‘सुरक्षित’, अशाप्रकारे होतेय फसवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता पर्यंत जे हॅकर्स क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून लोकांना गंडा घालत होते तेच आता सुरक्षित मानल्या जाणाऱ्या भीम, पेटीएम आणि गुगल पे पर्यंत पोहचले आहे. उत्तरप्रदेशात विविध जिल्ह्यात सायबर सेलने मागील 5 महिन्यात 12 पेक्षा आधिक गुन्हे दाखल केले आहेत. या हॅकर्सचे शिकार झालेल्या लोकांचे लाखो रुपये गायब झाले आहेत.

सायबर क्राईमचे एसपी सुशील धुळे यांनी सांगितले की हॅकर्स पहिल्यांदा जाळ्यात ओढलेल्या व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात, त्यानंतर चालाकीने यूपीआय आयडी पँकेजचे कूपन सांगून मोबाईलमध्ये सेव करतात. यानंतर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगण्यात येते, पैसे ट्रासफर झालेल्या व्यक्तीच्या खात्यातून तो पर्यंत पैसे गायब झालेले असतात.

सुशील धुळे यांनी सांगितले की जेव्हा सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकून एकाने सायबर सेलमध्ये तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांच्या तपासात समोर आले की, तक्ररारदारचे पैसे झारखंडच्या एका खात्यात ट्रान्फर झाले आहेत. खात्यावर देण्यात आलेल्या पत्तावर तपास केला तर तो पत्ता खोटा असल्याचे स्पष्ट झाले. आणि अकाऊंट देखील रिकामे झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा