सीम कार्डव्दारे लाखोंचा गंडा ; भामटयाकडून तब्बल 491 सीम कार्ड जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील ट्रॅकॉन कुरिअर कंपनीच्या नावाने सीम कार्ड खऱेदी करून कंपनीची २ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्याला सायबर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण ४९१ सीम कार्ड जप्त कऱण्यात आले आहेत.

चंदन गुप्ता असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला फऱासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०१९ मध्ये ट्रॅकॉन कंपनीने कंपनीच्या डिस्ट्रीब्यूटर मे. गेटवे कंपीचे चंदन गुप्ता याच्याकडून कंपनीसाठी सीमकार्ड खरेदी केले होते. त्यासाठी कंपनीच्या लेटरहेडवर ३४ आयडीया कंपनीचे पोस्टपेड सीमकार्ड मिळण्याची मागणी केली होती.

त्यानंतर सीमकार्ड हे अक्टिव्ह करून ते वापरले. त्यापैकी २० सीमकार्ड साधारण मे २०१९ पर्यंत कंपनीने बंद केले. सध्या १४ सीमकार्ड सुरु आहेत. मात्र दरमहा येणारे बील कंपनी भरत होती. मार्च २०१९ मध्ये गेटवे आयडीया कंपनीचा मालक चंदन गुप्ता याने ट्रॅकॉन कुरिअर कंपनीच्या लेटरहेडचा वारपर करून ४९१ सीमकार्ड कंपनीच्या परवानगीशिवाय अक्टिवेट केले होते.

त्यानंतर सीमकार्ड वापरल्याबाबत कंपनीला २ लाख १४ हजार रुपयांचे बील आले होते. त्याप्रमाणे फरासखाना पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे पथक याप्रकरणाचा तपास करत होता. तेव्हा पोलिसांनी तांत्रिक तपास करत होते. त्यानुसार तपास केल्यावर तो मिळून आला.

त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून ४९१ सीमकार्ड जप्त केले आहेत. त्याला पुढील तपासासाठी फरासखाना पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोल कर्मचारी राजकुमार जाबा, शाहरुख शेख, नवनाथ जाधव, अनिल पुंडलिक यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त – 

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?