सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांना ‘टाटा’ची पीएचडी प्रदान

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन

‘भारतातील सायबर आर्थिक गुन्हे : गुन्हेगारी न्याय प्रणालीला प्रतिसाद – मुंबई शहर एक अभ्यास’ या विषयावर सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांना टाटा सामाजिक संस्थेची पीएचडीची पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या ७८ व्या टाटा सामाजिक संस्थेच्या पदवीदान समारंभात एस.रामदुराई तसेच प्रमुख पाहुणे परिमल इंडस्ट्रीजचे अजय परिमल यांच्या हस्ते राजपूत यांना ही पीएचडी प्रदान करण्यात आली. राज्य शासनाने पीएचडी अभ्यासाकरिता परवानगी दल्यिानंतर राजपूत यांनी सन २०१३ मध्ये टाटा सामाजिक संस्थेत प्रवेशपूर्व परीक्षा पास केल्यानंतर सन २०१३ पासून ‘भारतातील सायबर आर्थिक गुन्हे : गुन्हेगारी न्याय प्रणालीला प्रतिसाद – मुंबई शहर एक अभ्यास’ या विषयावर विषयावर अभ्यास केला आहे.

राजपूत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपअधक्षिक म्हणून २००४ साली निवड झाल्यानंतर बुलढाणा येथील खामगावं, गडचिरोली जल्हियातील धानोरा तालुका, मिरज या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक म्हणून तर मुंबई येथे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, सोलापूर शहर, मुंबई झोन अकरा येथे पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामाची दखल शासनाने घेतली असून त्यांना केंद्र शासनाच्या अंतर्गत सुरक्षा पदक २०१०, महाराष्ट्र शासनाचे विशेष सेवा पदक २०१० आणि महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राजपूत हे मूळचे औंध करंडेवाडी येथील आहेत.

आर्थिक गुन्न्हे रोखण्यास मदत होइल : राजपूत

ज्या विषयावर आपण शेाधप्रबंध सादर केला आहे. त्यात आर्थिक स्वरुपाचे गुन्हे कशा पद्धतीने होतात यावर सूक्ष्म अभ्यास केला आहे. याचा निश्चितच ऑनलाइन पद्धतीने होणारे गुन्हे रोखण्यास मदत होइल. शासनालाही आपण आपला अहवाल सादर केला आहे. त्याचा निश्चितच फायदा होइल, अशी प्रतिक्रिया बाळसिंग राजपूत यांनी दिली आहे.

Loading...
You might also like