बनावट सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कार्यालयावर सायबर सेलचा छापा

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

ई-लर्निंग सॉफ्टवेअरचे सोर्स कोड वापरून बनावट सॉफ्टवेअर तयार करुन ते बाजारात कमी किंमतीत विकणाऱ्या धनकवडी येथील एका कार्यालयावर सायबर सेलने छापा मारला. या छाप्यात बनावट सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी जप्त करुन संबंधीतांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई के. के. मार्केटमध्ये करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ef86a077-ceda-11e8-8d08-0d9816263157′]

याप्रकरणी महेश सोपान पवार व  संतोष रतन गोसावी यांच्या विरुद्ध कॉपी राईट अॅक्टनुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समकन्सेप्टस टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीचे मालक बिरेन धरमसी यांनी फिर्य़ाद दिली आहे.

समकन्सेप्टस टेक्नॉलॉजीज कंपनी १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक क्षेत्रातील ई-लर्निंगचे सॉफ्टवेअर तयार करते. या कंपनीने तयार केलेले सॉफ्टवेअरचे सोर्स कोड वापरून आरोपींनी हुबेहुब सॉफ्टवेअर तयार केले. हे सॉफ्टवेअर मुळ कंपनीच्या दरापेक्षा कमी दरात त्याची विक्री करत होते. हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आरोपींनी के.के. मार्केटमधील एका गाळ्यात कार्यालय सुरु केले होते. याच कार्यालयातून बनावट सॉफ्टवेअरची विक्री होत असल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रारी अर्ज करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या सायबर सेलने या तक्रारी अर्जाची पडताळणी केली असता के.के. मार्केटमधील कार्यालयातून बनावट सॉफ्टवेअरची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. सायबर सेलच्या पोलिसांनी डमी ग्राहक आणि ग्राहकासोबत साध्या वेषातील पोलीस कर्मचाऱ्यांना या कार्य़ालयात सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी पाठवले. त्यावेळी कार्यालयात असलेल्या महेश पवार याने डमी ग्राहकास समकन्सेप्टस टेक्नॉलॉजीजने बनवलेल्या सॉफ्टवेअर सारखेच बनावट सॉफ्टवेअर डमी ग्राहकास दिले. तसेच त्याच्याकडून ७ हजार ५०० रुपये घेऊन ते सॉफ्टवेअर डोंगलमध्ये इन्स्टॉल करुन दिले. यानंतर सायबर सेलच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून सर्व साहित्य जप्त केले. आरोपींविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात माहीती तंत्रज्ञान कायद्यानुसार आणि कॉपी राईटचा गुन्हा दाखल कला आहे.

[amazon_link asins=’B01M0JSAFU,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae30071c-cedc-11e8-b8ea-eddb40b82eaf’]

ही कारवाई आर्थिक व सायबरचे पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधीका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, कर्मचारी नितेश शेलार, संतोष जाधव, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने केली.