भाजप आमदारांच्या बंधूंना ‘सायबर क्राईम’चा फटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहराचे भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूंच्या अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डची गोफणीय माहिती हॅक करुन ५६२६.६ अमेरिकन डॉलर ऑनलाईन पध्द्तीने काढून घेतले आहेत. सायबर क्राईम हा पोलिसासमोरील मोठा विषय झाला आहे. यापूर्वी शहरातील अनेकांना सायबर क्राईम द्वारे गंडा घातला असून आता तर चक्क आमदारांच्या बंधूंना याचा फटका बसला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7dfe0472-c14a-11e8-af8c-5df09ce8dd24′][amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e192d5d-c14a-11e8-a0d9-c9dbfcf12140′]
या प्रकरणी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधू माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप (४४, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार २० सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला आहे. तर त्यांच्या खात्यामधून भारतीय चलनाचे चार लाख २६ हजार ९४७ रुपये परस्पर काढून फसवणूक करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार बंधू शंकर जगताप यांच्याकडे अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड आहे. अज्ञात चोरट्यानी त्यांच्या परदेशी क्रेडिट कार्डची गोफणीय माहिती हॅक करून मिळवली. त्या माहितीच्या आधारे त्या क्रेडिट कार्डच्या खात्यावरून त्यांच्या परस्पर अमेरिकन डॉलर काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. तपास सांगवी पोलीस करत आहेत.

जगामध्ये सायबर क्राईमचा विळखा वाढत आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरातही दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. लाखो रुपये एक मिनिटात ट्रान्सफर करुन घेतले जात आहेत. हे रोखणे मोठे आव्हान आहे.