‘आम्ही पुणेकर’ या संस्थेकडून जम्मू-काश्मिरमधील गरजूंना सायकलींची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजू मुलांना व्हिल फॉर एज्युकेशनच्या माध्यमातून सायकलींची मदत करणा-या पुण्यातील ‘आम्ही पुणेकर’ या सामाजिक संस्थेने जम्मू-काश्मिरमधील रिआसी जिल्हयातील गरजूंना सायकलींची मदत देण्याकरीता पुढाकार घेतला. जम्मू-काश्मिरमध्ये देखील गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्याकरीता प्रोत्साहित करण्याकरीता शिक्षणाच्या माहेरघरातील पुणेकरांनी हा अनोखा उपक्रम थेट काश्मिरमध्ये जाऊन राबविला.

‘आम्ही पुणेकर’ संस्थेतर्फे रिआसी जिल्हयात व्हिल फॉर एज्युकेशन अंतर्गत ५० सायकली प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शारदा ज्ञानपीठमंचचे संस्थापक पं.वसंतराव गाडगीळ, रिआसी जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ.सागर डोईफोडे, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, अ‍ॅड.मिलिंद पवार, अखिल झांजले, संतोष रासकर, डॉ.राजेंद्र खेडेकर, अविनाश मेदनकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाला पुणे धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांसह सृजन डिझाईन अ‍ँड कॉलेज निलाया एज्युकेशन पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या प्रसंगी पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, काश्मिर आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांचे विद्यासंस्कृतीचे पवित्रक्षेत्र असे नाते सुवर्णभूमी भारताच्या अतिप्राचीन काळापासून सुदृढ आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून काश्मिरमध्ये शिक्षणाकरीता मदतीचा हात देण्याचा उपक्रम काश्मिरमधील नागरिकांशी पुणेकरांचे संबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

डॉ.सागर डोईफोडे म्हणाले, शिक्षणासाठी घेतलेल्या अशा राष्ट्रप्रेम संवर्धक उपक्रमांमुळे महाराष्ट्र-काश्मिर स्नेहबंध वज्रमुठीसारखे कायम बळकट होत राहतील. पुणे आणि काश्मिर यामध्ये मैत्री संवर्धनाचे कार्यक्रम घेऊन येणा-यांसाठी माझे शासन नेहमीच स्वागत करेल, असा आश्वासन त्यांनी दिले.

Loading...
You might also like