Cyclone Amphan : 1999 नंतर दुसर्‍यांदा महावादळाचा सामना करणार भारत, सर्व सेना अलर्ट

कोलकाता/भूवनेश्वर : वृत्तसंस्था – चक्रीवादळ अम्फान मंगळवारी सायंकाळी एका अतिशय धोकादायक महा चक्रीवादळात रूपांतरीत होणार आहे. भारतीय हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. या चक्रीवादळामुळे ओडिसाच्या किनार्‍यावर जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर ओडिसा सरकारने किनार्‍यावरील 11 लाख लोकांना बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे. सुमारे 195 किमी. प्रति तास वेगाने अम्फान वादळ 20 मेच्या सायंकाळी पश्चिम बंगालच्या किनार्‍यावर धडकणार आहे.

ओडिसात चक्रीवादळ अम्फानचा धोका लक्षात घेऊन किनार्‍यावरील जगतसिंहपुर येथील नागरिकांना काल रात्री सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. अम्फानमुळे होणारा मुसळधार पाऊस आणि वादळीवारा यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.

भारतीय हवामान खात्याने माहिती दिली की, पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य बंगालच्या खाडीजवळ असणारे च्रकीवादळ अम्फान, मागील सहा तासांपासून 14 किमी प्रति तास वेगाने उत्तर-पूर्वेकडे सरकत आहे. आयएमडीने सांगितले की, वादळ आज सकाळी 5.30 वाजल्यापासून बंगालच्या खाडीच्या पश्चिम-मध्यावर केंद्रीत आहे, जे ओडिसाच्या पारा बेटापासून 520 किमी दूर आहे.

पश्चिम बंगाल-बांग्लादेश किनार्‍यावर आज दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत ते धडकू शकते. चक्रीवादळ अम्फानने सोमवारी खुपच विक्राळ रूप धारण केले होते. तर, भारतीय हवामान खात्याने मंगळवारी माहिती दिली की, अम्फान चक्रीवादळ उत्तर-उत्तरपूर्वेकडे वळून उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीकडे जाण्याची शक्यता आहे.

हे पश्चिम बंगाल-बांग्लादेशच्या किनार्‍यादरम्यान असलेले दिगी आणि हतिया बेट, जे सुंदरबनच्या जवळ आहे, त्याच्या जवळून आज दुपारी किंवा सायंकाळी जाण्याची शक्यता आहे. येथे पोहचेपर्यंत हे च्रकीवादळ अत्यंत धोकादायक चक्रीवादळात रूपांतरीत होईल.

चक्रीवादळ अम्फानमुळे जोरदार वादळीवारा आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ओडिसा सरकारने या परिसरातील 11 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हालवले आहे. या लोकांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले आहे. पश्चिम बंगाल सरकारने सुद्धा खालील भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरूवात केली आहे.