Cyclone Biparjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 36 तासांत तीव्र होणार; महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली/मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Cyclone Biparjoy Update | ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy Update) भारतावर परिणाम होताना दिसत आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 36 तासांत तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. या पार्श्वभूमीवर चार राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक (Karnataka), गोवा (Goa), महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात (Gujarat) या चार राज्यात दक्षता घेण्यात येत आहे.
मच्छिमारांनी अरबी समुद्रात (Arabian Sea) जाऊ नये, असा सल्ला मागील तीन ते चार दिवसांपासून हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) देण्यात येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy Update) परिणाम गुजरातमध्ये दिसू लागला आहे. येथील वलसाडमध्ये समुद्र किनाऱ्यावर जोरदार लाटा उसळत आहेत. या वादळाचा प्रभाव सुरतमध्ये दिसून येत आहे. खबरदारी म्हणून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1667378545285554176
दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत.
कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे.
त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला
हवामान खात्याने दिला. त्याचबरोबर या चक्रीवादळाचा परिणाम भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह
अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
‘या’ चार राज्यात चक्रीवादळाचा प्रभाव दिसणार –
– महाराष्ट्र (Maharashtra)
– गुजरात (Gujarat)
– कर्नाटक (Karnataka)
– गोवा (Goa)
Web Title : Cyclone Biparjoy Update | Cyclone Biparjoy to intensify in next 36 hours; Vigilance alert for Karnataka, Goa, Gujarat states along with Maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
MP Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पण…