Cyclone Biporjoy Update | चक्रीवादळाचा जोर वाढला; मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटा उसळण्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Cyclone Biporjoy Update | देशाच्या किनारी भागातील आपत्ती व्यवस्थापन पथकांना (Disaster Management Team) आधीच सतर्क करण्यात आले आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biporjoy Update) धोका आता देशाच्या किनारपट्टीला आहे. येत्या 48 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे. या चक्रीवादळाचा भारताच्या किनारपट्टीवरही परिणाम होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पुढील तीन दिवस तीव्र होऊ शकतो.

 

बिपरजॉय चक्रीवादळ (Cyclone Biporjoy Update) पाकिस्तानच्या दिशेने सरकत आहे. सध्या चक्रीवादळ कर्नाटक (Karnataka), गोवा (Goa), महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातच्या (Gujarat) किनारी भागातून पुढे सरकत आहे, पण याचा किनारपट्टी भागात परिणाम दिसून येईल. किनारपट्टी भागात जोरदार वादळी वारे वाहतील आणि काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.

 

दि. 8 ते 10 जून रोजी दरम्यान समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवली होती. दि.12 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानात धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आता हळूहळू पूर्व-मध्य अरबी समुद्रावर उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना धोका –

Advt.

हवामानाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मुंबई (Mumbai), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg)
किनारपट्टीवर लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, पालघर शहरासह कोकण (Konkan) किनारपट्टी भागामध्येही या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो.
गुजरातला देखील या चक्रीवादळाचा फटका बसण्याचा अंदाज आहे.

 

 

Web Title :  Cyclone Biporjoy Update | imd alert maharashtra gujarat karnataka goa from arab sea cyclone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा