Cyclone Nisarga : महाराष्ट्रात 3 लोकांचा मृत्यू, 4 जिल्ह्यातील वीज गायब, लाखो लोक अंधारात

मुंबई : चक्रीवादळ निसर्ग बुधवारी मुंबईच्या जवळ पोहचले, परंतु कोविड-19 महामारीशी झुंज देणार्‍या या महानगराला त्याने प्रभावित केले नाही. सायंकाळी ते कमजोरही पडले. मात्र, रायगड आणि पालघर जिल्ह्यात वादळामुळे झाडे उन्मळून पडली. महाराष्ट्राच्या किनारी भागात दुपारी 120 किमी प्रति तासाच्या वेगाने पोहचल्यानंतर सायंकाळी ते कमजोर पडले. रात्री उशीरा ते आणखी कमजोर झाले.

भारतीय हवामान विभागाने नवी दिल्लीत ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील उमात गावात चक्रीवादळ आल्यानंतर आपल्या घरी येण्यासाठी धावत असलेल्या 58 वर्षीय एका व्यक्तीवर वीजेचा ट्रान्सफॉर्मर कोसळला, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अधिकार्‍यांनी सांगितले की, चक्रीवादळाच्या दोन वेगळ्या घटनांमध्ये पुणे जिल्ह्यात दोन मृत्यू झाले.

निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामध्ये पालघर, रायगड़, ठाणे आणि पुणे येथील 25 लाख वीज ग्राहक अंधारात आहेत.

पुणे के ऊपर मौजूद चक्रवात

भारतीय हवामान विभागाने सांगितले की, निसर्ग चक्रीवादळ बुधावारी दुपारी महाराष्ट्राच्या किनारी भागात 120 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहचले. ते अरबी समुद्रातून आले आणि दुपारी सुमारे साडेबारा वाजता रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये धडकण्यास सुरूवात केली. ही प्रक्रिया दुपारी अडीच वाजता पूर्ण झाली. चक्रीवादळ पुढील सहा तासात हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरीत होण्याची शक्यता आहे आणि सध्या ते महाराष्ट्रातील पुण्याच्या वर आहे.

गुजरातचा धोका टळला

गुजरातच्या किनारी भागातील जिल्ह्यांसह मुंबईकर आणि शेजारी परिसरातील लोकांनी या चक्रीवादळाला तोंड देण्याची तयार केली होती, परंतु येथे झाडे उन्मळून पडण्यापलिकडे जास्त नुकसान झाले नाही, यामुळे लोकांनी निश्वास सोडला. येथे सर्व यंत्रणा अलर्ट होत्या, पण वादळाने अपेक्षित तडाखा दिला नाही.

कमजोर पडल्याने झाले कमी नुकसान

हवामान विभागने सांगितले की, वादळात कच्ची घरे, झाडे, वीजेचे खाब पडतील अशी शकयता असल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, खुप कमी नुकसान झाले.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, मुंबईत निसर्ग वादळाचा धोका कमी झाला आहे. परंतु, पुढील काही तास महत्वाचे आहेत. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन पुणे, नाशिक आणि अहमदनगरमध्ये अधिकारी हाय अलर्टवर आहेत. मंत्र्यांनी ट्विट केले की, मुंबईचा चक्रीवादळाचा धोका कमी झाला आहे, परंतु काही तास आता महत्वाचे आहेत. चक्रीवादळ आपल्या केंद्रापासून 200 किमी दूरपर्यंतच्या क्षेत्राला आपल्या प्रभावाखाली घेऊ शकते.

सायंकाळी चार वाजता कमजोर पडण्यास सुरूवात झाली

हवामान विभागाच्या एका बुलेटिननुसार चक्रीवादळ 90 ते 100 किमी वेगाने वार्‍यासोबत सायंकाळी चार वाजता कमजोर पडण्यास सुरूवात झाली. विभागाने सांयकाळी एका बुलेटिनमध्ये म्हटले की, हे वादळ रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या वर आहे. हवेचा सध्या वेग कमी होऊन 65 ते 75 किमी प्रति तास झाला आहे. हे चक्रीवादळ रात्री उशीरापर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरीत होईल.

जनावरांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकण्यापूर्वी मुंबईच्या प्राणीसंग्रहालयतील सर्व मांसाहारी जनावरांना पाऊस आणि वादळीवारापासून वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आले होते. प्राणी संग्रहालयाच्या सर्व कर्मचार्‍यांना अलर्ट करण्यात आले होते. शहरात वीरमाता जीजाबाई उद्यानात वादळापासूनचे नुकसान टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली होती. हे प्राणी संग्रहालय 50 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. बीएमसीच्या अधिकार्‍याने सांगितले की, वाघ, बिबट्या आणि वाघ, बिबट्या आणि तरस यासारख्या मांसाहारी प्राण्यांना सुरक्षित स्थळी ठेवले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांना सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे एनडीआरएफची पथके राज्यातील विविध भागात तैनात आहेत.