Cyclone Nivar चा अलर्ट : समुद्रात उसळल्या लाटा, तामिळनाडू उद्या सुटीची घोषणा, रेल्वेने रद्द केल्या या गाड्या, वाचा अपडेट्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बंगालच्या खाडीवर जास्त दाबाचे क्षेत्र चक्रीवादळ निवार मध्ये परावर्तीत झाले आहे. हवामान विभागानुसार, निवार वादळ बुधवारी सायंकाळी 5 वाजता तमिळनाडु आणि पुदुचेरीच्या किनार्‍यावर धडकू शकते. चक्रीवादळाच्या अलर्टच्या दरम्यान तमिळनाडु, पुदुचेरी आणि करायकलच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

अनेक रेल्वे गाड्या केल्या रद्द

तमिळनाडु, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात चक्रीवादळ निवार च्या अलर्टमुळे दक्षिण रेल्वेने अनेक ट्रेन रद्द केल्या आहेत. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 जोड्या म्हणजे 24 ट्रेन 25 नोव्हेंबरला पूर्णपणे रद्द राहतील. तर काही ट्रेन आंशिक प्रकारे रद्द केल्या आहेत.

या रेल्वे गाड्या अंशत: रद्द

ट्रेन नंबर 02897 Puducherry-Bhubaneswar स्पेशल ट्रेन 25 नोव्हेंबरला Puducherry- Chennai Egmore च्या दरम्यान रद्द राहील. अशाच प्रकारे ट्रेन नंबर 02868 Pudecherry-Howrah स्पेशल ट्रेनसुद्धा 25 नोव्हेंबरला Puducherry-Villupuram च्या दरम्यान रद्द राहील. याशिवाय ट्रेन नंबर 06232, 06188, 02898, 06231, 06187, 02084, 02083, 02897 आणि 02868 सुद्धा 25 नोव्हेंबरला अंशत: रद्द राहील.

25 नोव्हेंबरला वादळ धडकण्याची शक्यता

हवामान विभागानुसार हे वादळ, 25 नोव्हेंबरच्या सायंकाळी करायकल आणि मामल्लापुरमच्या दरम्यान तमिळनाडु आणि पुदुचेरीच्या किनार्‍यावर धडकू शकते. या दरम्यान 100 ते 110 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळाच्या परिणामामुळे तमिलनाडुत जोरदार पाऊस सुरू आहे, तर पुदुचेरीच्या गांधी किनार्‍यावर जोरदार वारे वाहत आहेत. जोरदार वार्‍यांमुळे समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत.

पुदुचेरीमध्ये आज रात्री कलम 144 लागू, तामीळनाडुत सुटी जाहीर

चक्रीवादळ निवार च्या धोक्यामुळे पुडुचेरीच्या जिल्हाधिकार्‍यांनी आज रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात 26 नोव्हेंबरपर्यंत कलम 144 लावण्याचा आदेश जारी केला आहे. या दरम्यान सर्व दुकाने बंद राहतील. मात्र, दूधाची दुकाने आणि पेट्रोल पंप उघडण्याची परवानगी आहे. दरम्यान, तामिळनाडुच्या सीएमने उद्या सुटी जाहीर केली आहे.

तमिळनाडु-पुदुचेरीत एनडीआरएफची पथके तयार

तमिळनाडु-पुदुचेरीमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या डीजींनी सांगितले की, आंध्र प्रदेश, तमिळनाडु आणि पुदुचेरीत एकुण 30 पथके तयार आहेत. हवामान विभागाने जारी केलेल्या चक्रीवादळाच्या इशार्‍यानंतर तमिळनाडुच्या नागापट्टीनम आणि करायकल प्रदेशात एनडीआरएफची 6 पथके अलर्ट झाली आहेत.

पीएम मोदी यांनी दिले मदतीचे आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडुचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायण सामी यांच्याशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी पीएम मोदी यांनी केंद्राकडून शक्य तेवढी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. पीएम मोदी यांनी यासंदर्भात ट्विट केले की, प्रभावित प्रदेशांमध्ये राहणार्‍यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो.

You might also like