राज्यात ‘क्यार’ वादळामुळं आगामी 12 तासात ‘मुसळधार’ पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की क्यार या वादळामुळे पुढील 12 तासात महाराष्ट्रात किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे यासह जोरदार वादळी वारे देखील किनारपट्टीला येऊन धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईच्या केंद्रातून दुपारी ही चेतावानी दिली.

अरबी समुद्रात शुक्रवारी वेगवान वादळ येण्याची शक्यता आहे, हवामान विभागाच्या एका आधिकाऱ्यांने सांगितले की पुढील 12 तासात क्यार या शक्तिशाली वादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे, तसेच पुढील 24 तासात हे वादळ आधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे की हे वादळ ओमान देशाच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यानुसार येत्या 24 तासात 204.5 मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की क्यार वादाळाचा वेग 85 किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत ते आणखी प्रभावशाली होऊन 110 किलोमीटर प्रति वेगाने वाहण्याची शक्यता वर्तवून हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा