‘तौत्के’ चक्रीवादळामुळे ‘पुणे- भुज’ एक्सप्रेससह 61 गाड्या रद्द

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय हवामान खात्याने मंगळवारी (दि. 18) गुजरातच्या किनारपट्टीवर तौत्के चक्रीवादळ धडकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 17) पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी पुणे – भुज एक्सप्रेस रद्द केली आहे. तसेच गुजरातहून सुटणा-या जवळपास 61 गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. सोमवारी भुज एक्सप्रेस रद्द झाल्याने बुधवारी (दि. 19) भुजहून पुण्याला येणारी एक्सप्रेस देखील रद्द केल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पश्चिम रेल्वेने 16 ते 20 मे दरम्यान गुजरात राज्यातून सुटणाऱ्या जवळपास 61 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. यात मुंबई, पुणेसह दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. 17 आणि 18 रोजी प्रवास सुरु करणारी व पुणे स्थानकावरून धावणारी राजकोट सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस. राजकोट – वेरावल एक्सप्रेस व पोरबंदर – सिकंदराबाद एक्सप्रेस या गाड्या देखील रद्द केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.