Cyclone Tauktae : बार्ज दुर्घटनेतील 86 जणांचे मृतदेह सापडले, अवस्था इतकी वाईट की DNA टेस्टद्वारे ओळख पटणार

मुंंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चक्रीवादळ तौक्तेदरम्यान अरबी समुद्रात बार्ज आणि टग दुर्घटनेत वाहून गेलेल्या 274 कर्मचार्‍यांपैकी 188 जणांना जीवंत काढण्यात आले तर 86 जणांचे मृतदेह मिळाले. समुद्रात चार-पाच दिवस राहिल्याने मृतदेह इतके खराब झाले आहेत की 86 पैकी 31 मृतदेहांची ओळख पटणे अवघड झाले आहे, यासाठी ज्यांचे लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यांच्या कुटुंबियांना डीएनए टेस्टसाठी बोलावण्यात आले आहे.

पलविंदर सिंह आपला भाऊ प्रदीप सिंह सैनी साठी तर 10 वर्षांचा दिव्यांशु आपले वडील संतोष कुमार यादव यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए सॅम्पल देण्यासाठी आला आहे. छोट्या भावाचा फोटो हातात घेऊन पलविंदर म्हणाले, आम्ही जीवंत माणून दिला होता, हे डेड बॉडी दाखवत आहेत. पलविंदर यांनी म्हटले, कंपनीवाले दुर्लक्ष करत आहेत. मॅथ्यू कंपनी कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे ते दिवसा कोणताही कॉल करणार नाहीत. हेच सांगतील येऊन बॉडी आयडेंटिफाय करा. आम्ही जीवंत माणूस दिला होता आणि तुम्ही मृतदेह देत आहात.

संतोष कुमार यादव यांचा 10 वर्षांचा मुलगा दिव्यांशु नाव विचारताच रडू लागला. दिव्यांशुला त्याचे मामा उत्तरप्रदेशच्या जौनपुर जिल्ह्यातून मुंबईत डीएनए टेस्ट करण्यासाठी घेऊन आले आहेत. संतोष यांचे नातेवाईक अनिल यादव म्हणाले, संतोष अजूनही मिसिंग आहे. आम्ही शोध घेत आहोत. डीएनएसाठी मुलाला आणले आहे. छोट्या दिव्यांशुला सांभाळणे अवघड झाले आहे. जेजे मार्गावर सर्व मृतदेह ठेवले आहेत. आता पीडितांसाठी हेल्प डेस्क तयार केला आहे परंतु अजूनही 31 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या दरम्यान पोलिसांनी बार्ज पी305 च्या कॅप्टनवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु जाणकारांचे म्हणणे आहे की, पी305 बार्ज होते ज्यावर कॅप्टन नाही तर बार्ज मास्टर असतो. बार्जमध्ये स्वताचे इंजिन नसते त्यास खेचण्यासाठी टगची आवश्यकता असते, यासाठी तो स्वता निर्णय घेऊ शकत नव्हता.

फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाचे महासचिव मनोज कुमार यादव म्हणतात, जो बार्ज मास्टर आहे, मी त्यास कॅप्टन म्हणणार नाही. बार्ज मास्टर मॅनेजमेंट आणि चार्टरच्या निर्णयावर पूर्णपणे अवलंबून होता. जरी तुम्ही त्यास नोटीस जरी दिली की जहाज घेऊन निघणे शक्य नाही. कारण त्या जहाजात प्रोपेलर नव्हते. ते स्वता नेव्हिगेट करू शकत नाही. त्यास टोईंगची गरज असते आणि टग किंवा टोईंग वेसल आहे जे चार्टर्ड आणि मॅनेजमेंट ठरवते. प्रश्न केवळ हा नाही की चक्रीवादळ तौक्तेची कल्पना असूनही खोल समुद्रा थांबण्याचा निर्णय का घेण्यात आला. बार्ज खुप जुने असणे, ब्लॅक लिस्टेड कंपनीकडून खरेदी केलेले असणे आणि त्याच्या फिटनेसवर सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत. याच कारणामुळे मुंबई पोलीस आता बार्जच्या फिटनेसबाबत आवश्यक परवानगी आणि बार्ज मास्टर अणि बेसच्या दरम्यान झालेल्या चर्चेशी संबंधीत सर्व कागदपत्र मागवून तपास करत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, कारवाई त्यानंतरच पुढे सरकेल.