दुर्देवी ! तौक्ते चक्रीवादळात ONGC चा ‘बार्ज’ बुडाला, नौदलाला 14 कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले तर 75 जणांचा शोध सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात भयानक असलेला तौक्ते चक्रीवादळाने गोंधळ घातला. या वादळाच्या संकटामुळे अनेक जणांचे नुकसान आणि अनेक लोक मृत्यू देखील पडले आहेत. तर या तौक्ते चक्रीवादळाने नौदल मध्ये देखील दुर्देवी धक्का दिला आहे. हि सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे. या वादळात जहाज बुडाल्याने बेपत्ता असलेल्या ओएनजीसीचे (ONGC) ८९ पैकी १४ कर्मचाऱ्यांचे जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर २७६ कर्मचाऱ्यांपैकी १८४ जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. तर बाकी ७५ जणांचा शोध नौदल घेत आहेत.

अधिक माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळात हीरा ऑईल फिल़्डजवळ ONGC साठी काम करणाऱ्या कंत्राटदाराची जहाज (P305) बुडाली होती. यावरील १८४ जणांना वाचविण्यात आले आहे. तसेच, कॅप्टन सचिन सिकेरिया यांनी म्हटले की, आम्ही आताच ONGC कोचीवरून १२५ जणांना आणले आहे. तर समुद्रातील परिस्थिती आता निवळत आहे. अजून काही जणांचा शोध सुरु आहे. आम्ही अजून अपेक्षा सोडलेली नाही. आम्ही वाईट घटना मागे सोडून आलो असू असे वाटते, असे सिकेरिया यांनी सांगितले आहे. यानंतरच काही वेळातच समुद्रात १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह वाढल्याची बातमी आलीय.

या दरम्यान, जहाजामध्ये एकूण २७६ होते. तर बाकी कर्मचारी लाईफ जॅकेटच्या मदतीने सुखरुप असतील अशी आशा केली जात आहे. नौदलाने वाचविलेले १८४ जण नुकतेच मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांनी भर समुद्रात चाललेला मृत्यूचा तांडव सर्व हकीकत सविस्तर सांगितले आहे. ११ तास लाईफ जॅकेटवर उधानलेल्या समुद्रात तरंगत होते. नौदलाने बचाव कार्यावेळी या सर्वाना वाचवण्यात आले आहे.