Cyclone Tauktae : अमृता फडणवीसांच्या ‘शायरी’ला राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचा जवाब, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संकटाचा सामना करणा-या महाराष्ट्राला आता तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. ठाकरे सरकार खंबीरपणे या संकटालाही तोंड देत आहे. मुंबईसह शेजारील जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी झाडं, विजेचे खांब कोसळले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही तुंबले आहेत. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा दिला आहे. दरम्यान या वादळाला अनुसरुन अमृता फडणवीस यांनी शायरी केली आहे. फडणवीस यांच्या या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिले आहे.

तुफाँ तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है ! असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यावर रुपाली चाकणकर यांनीही शायरीतूनच उत्तर दिले आहे. तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है, महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. दरम्यान जळगावचे भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनीही एक ट्विट करुन हशा पिकवला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोलाही लगावला आहे. चक्रीवादळ गुजरातला पळविण्याचा मोदी-शहांचा डावसंजय राऊत चक्रीवादळाला मुंबईतच अडवणार, असे मजेशीर ट्विट पाटील यांनी केले आहे.