एमआयडीसीतील कंपनीत सिलेंडरचा स्फोट; १ ठार ,२ जखमी 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

येथील शिरोली एमआयडीसीत के इंडस्ट्रीजमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आहे.  या सिलेंडर च्या स्फोटात 1 ठार तर 2 जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

स्फोटात उत्तर प्रदेशचा नितीन कुमार आर्या  हा जागीच ठार तर अमित वंजारे आणि  वसंत परीट हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेले अमित वंजारे आणि वसंत परीट यांच्यावर येथील सी. पी. आर. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.