Cyrus Mistry Car Accident | अपघातात सायरस मिस्त्रींचा मृत्यू, मर्सिडीज चालवणार्‍या ‘अनाहिता पंडोले ‘ कोण आहेत?

नवी दिल्ली : Cyrus Mistry car accident | टाटा सन्स (Tata Sons) चे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी कार अपघातात निधन झाल्याने संपूर्ण देश हळहळला आहे. प्राथमिक तपासानंतर सायरस मिस्त्री ज्या सिल्व्हर कलरच्या मर्सिडीजमध्ये होते ती अनाहिता पंडोले (Anahita Pandole) चालवत होत्या, असे पोलिसांनी म्हटले आहे. कारमध्ये एकूण चार जण होते, ज्यामध्ये सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले मागे बसले होते. (Cyrus Mistry car accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागे बसलेल्या दोघांनीही सीट बेल्ट लावला नव्हता, तर अनाहिता पंडोले गाडी चालवत होत्या आणि त्यांचे पती डेरियस पंडोले त्यांच्या शेजारी बसले होते.

या घटनेत सायरस मिस्त्री आणि जहांगीर यांचा मृत्यू झाला आहे. जहांगीर हे अनाहिता पंडोले यांचे पती डेरियस यांचे भाऊ होते. या घटनेत अनाहिता आणि त्यांचे पती डेरियस पंडोले (60) हे देखील जखमी झाले, त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. (Cyrus Mistry car accident)

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबईपासून 120 किमी अंतरावर ही घटना घडली. गुजरातमधील अहमदाबादहून मुंबईला परतत असताना पालघरमध्ये त्यांची आलिशान कार दुभाजकाला धडकली. वृत्तानुसार, कारचा वेग खूप होता आणि कार चालवत असलेल्या अनाहिता पंडोले यांनी दुसर्‍या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये कार दुभाजकावर आदळली.

कोण आहेत अनाहिता पंडोले?

55 वर्षीय अनाहिता पंडोले या मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ (gynecologist) आहेत. त्या मुंबईतील ब्रीच कँड हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांना एकूण 32 वर्षांचा अनुभव आहे आणि तज्ञ म्हणून 25 वर्षांचा अनुभव आहे.

अनाहिता यांनी 1990 मध्ये टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटलमधून एमबीबीएस पूर्ण केले. 1994 मध्ये त्याच महाविद्यालयातून त्यांनी ऑब्जटेट्रिक्स आणि गायनोकोलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना इन्फर्टिलिटी मॅनेजमेंट, हाय रिस्क ऑब्जटेट्रिक्स आणि एंडोस्कोपी सर्जरीत त्या तज्ज्ञ आहेत.

त्या परजोर फाउंडेशन (Parzor Foundation) शी संबंधित आहेत.
अनाहिता यांनी बॉम्बे पारसी पंचायत योजनेच्या संयुक्त विद्यमाने 2004 मध्ये बॉम्बे पारसी पंचायत फर्टिलिटी प्रोजेक्ट (The Bombay Parsi Panchayat Fertility Project) सुरू केला.
पारशी जोडप्यांना परवडणारे फर्टिलिटी उपचार आणि त्यांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

’फर्टिलिटी प्रोजेक्ट’नंतरच जिओ पारसी योजना सुरू झाली.
जिओ पारसी योजनेत अनाहिता पंडोले यांचा मोठा वाटा होता.
या योजनेत त्यांनी दिलेल्या सूचनांबद्दल त्यांचे खूप कौतुकही झाले.

यासोबतच मेथडॉलॉजी राबवण्यात अनाहिता यांचा मोठा वाटा होता.
त्या जियो पारसी टीमला मेडिकलच्या बाबतीत सतत मार्गदर्शन करत होत्या.
बेकायदा होर्डिंग्जवरही त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला.

अनाहिता यांची बेकायदा होर्डिंग्जविरोधात मोहीम

डॉ. अनाहिता पंडोले या अनेक प्रकारच्या सामाजिक कार्याशी जोडल्या गेल्या आहेत.
बेकायदा होर्डिंग्जविरोधातही त्यांनी मोहीम राबवली. त्यामुळे त्याला खूप प्रसिद्धीही मिळाली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर खांबांवर लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे अनाहिता नाराज असत.
हे न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बीएमसीने तोडलेल्या झाडांची छायाचित्रे घेऊन त्या अनेकदा वृत्तपत्र कार्यालयात जात असत.

त्यांनी न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. ज्यामध्ये कायद्याचे पालन होईपर्यंत बीएमसीला होर्डिंग लावू देऊ नये, असे म्हटले होते. अनाहिता या पर्यावरणप्रेमी आहेत.

पंडोले कुटुंब आणि त्यांचा व्यवसाय

पंडोले कुटुंबाचे मिस्त्री कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत. दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या जवळची आहेत.पंडोले कुटुंब हे अतिशय श्रीमंत कुटुंब आहे.
कुटुंबाकडे ड्यूक (Duke) नावाची सॉफ्ट ड्रिंक कंपनी होती, जी कुटुंबाने सुमारे वीस वर्षांपूर्वी पेप्सीला विकली.
डॉ. अनाहिता पंडोले यांचे पती डेरियस हे जेएम फायनान्शियल प्रायव्हेट इक्विटीचे एमडी आणि सीईओ आहेत.

Web Title :- Cyrus Mistry Car Accident | cyrus mistry car accident driver anahita pandole profile

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | जेष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करुन मोबाईल नेला हिसकावून; खराडी येथील सकाळची घटना

Pune Pimpri Crime  | ‘तु मला खुप आवडतेस, तुझा मोबईल नंबर दे’ ! मिठी मारुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हिंजवडीमधील घटना