Cyrus Mistry Death | टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील मोठा उद्योग समूह असलेल्या टाटा समूहाचे (Tata Group) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन (Cyrus Mistry Death) झाले आहे. आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबाद-मुंबई महामार्गावर (Ahmedabad-Mumbai Highway) सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Death) यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला आहे. तर गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Palghar SP Balasaheb Patil) यांनी दिली.

 

सायरस मिस्त्री हे अहमदाबाद येथून मुंबईच्या दिशेने मर्सिडीज (एमएच 47 एबी 6705) कारमधून जात होते. महामार्गावरील चारोटी येथील सूर्या नदीवरील पुलावरील रोड डिव्हायडरला धडकली. यामध्ये गंभीर जखमी होऊन सायरस मिस्त्री यांचे निधन झाले, असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

अपघात झाल्यानंतर जागेवरच दोघांचा मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सायरस मिस्त्री यांनी 2019 मध्ये टाटा समूहाची जबाबदारी सांभाळली होती.

 

Web Title :- Cyrus Mistry Death | Sad News ! Accidental death of former chairman of tata group cyrus mistry in palghar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा