टाटा व्यवस्थापनाला धक्का! सायरस मिस्त्रींची ‘हकालपट्टी’ बेकायदेशीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सायरस मिस्त्री यांची तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २४ ऑक्टोबर २०१६ रोजी टाटा चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या विरोधात सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे दाद मागितली होती. यासंदर्भात लवादाने मिस्त्री यांच्या बाजूने निकाल दिल्याने टाटा समुहाला सायरस मिस्त्री यांची पुनर्नियुक्ती करावी लागणार आहे.

सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर २९ डिसेंबर २०१२ रोजी टाटा कंपनीचे चेअरमन पद स्वीकारले होते. तत्पूर्वी, नोव्हेंबर २०११मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती.

सायरस मिस्त्री यांचा जन्म ०४ जुलै १९६८ रोजीचा असून त्यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/