Cyrus Poonawalla | सायरस पुनावाला यांची केंद्रावर जोरदार टीका, म्हणाले – ‘भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं’ (व्हिडीओ)

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला 110 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला 10 कोटी लसींचे उत्पादन (Vaccine production) हि सोपी गोष्ट नाही. भारत सरकार (Government of India) वर्षाअखेरीस लसीकरण पूर्ण होण्याचे आश्वासन देत आहे. त्यांनी अशा थापा मारणे बंद करावे, अशी टीका सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांनी मोदी सरकारवर केली आहे. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारात ते बोलत होते. सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना टिळक पुरस्कार (Tilak Award) देऊन गौरविण्यात आले.

परदेशात लस पाठवण्यास बंदी घालून वाईट केले

मोदी सरकारने (Modi government) लस परदेशात पाठवण्यास बंदी घालून अतिषय वाईट गोष्ट केली आहे. माझा मुलगा मला म्हणाला की यावर बोलू नका, पण मी बोलणार आहे.
कारण सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) अनेक वर्षापासून जगभरातील 170 देशांना लसींचा पुरवठा करत आहेत. मात्र, आता गरज असताना त्यांना लस देता येत नाही.
या देशांसाठी लसीसाठी अधिक पैसे दिलेत. बिल गेट्स फाउंडेशनने (Bill Gates Foundation) 5 हजार कोटी दिले आहे. लसींची निर्यात सुरु केली पाहिजे.
अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्याना लस पाठवायची आहे, असेही सायरस पुनावाला यांनी सांगितले.

 

 

मी ‘कॉकेटल’ लसीच्या विरोधात

कॉकेटल लस संदर्भात (Cocktail vaccine) बोलताना सायरस पुनावाला म्हणाले, मी कॉकटेल लसीच्या विरोधात आहे. पण आताच्या लसींची परिणामकारकता कमी होऊ शकते.
बुस्टर डोसची गरज पडेल. त्यासाठी मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी तिसरा डोस घेतला आहे.
कोव्हीशिल्डच्या (Coveshield) दोन डोसमध्ये कमीत कमी दोन महिन्याचे अंतर पाहिजे.
तसेच ज्यांना कोरोना झाला आहे अशा व्यक्तींनी सहा महिन्यानंतर लस घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

पुण्याला जस्त लस द्या, सरकाचे उत्तर नाही

पुण्यामध्ये (Pune) सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याचं अहवालातून समोर आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबाबत विचारणा केली होती.
परंतु केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचे सायरस पुनावाला म्हणाले.

 

Web Title : Cyrus Poonawalla | government india stop promise strong criticism cyrus punawala

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

New Scrapping Policy | PM मोदींकडून मोठी घोषणा ! रस्त्यावरून हटवणार जुन्या गाड्या, कमी होईल प्रदुषण

Wardha Police | गुंडांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच केला गोळीबार, परिसरात एकच खळबळ

Acne | तुम्ही ‘या’वर विश्वास ठेवल्यास मुरुमांपासून कधीही मुक्त होणार नाही