Cyrus Poonawalla | शरद पवारांच्या मित्राकडून PM मोदींचं कौतुक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कोरोनाच्या महामारीत जगात कोरोना लसीचा साठा उपलब्ध करून देणारा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे, याबाबत सीरम इस्न्टिट्यूटचे (Serum Institute) संस्थापक सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. तुम्हाला कल्पना नसेल 50 वर्षांपूर्वी सीरमची स्थापना होताना तिच्या नावापासून ते विविध परवाना काढेपर्यंत नोकरशाहीने खूप त्रास दिला, असं सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी म्हटलं आहे. पुनावाला हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (Tilak Maharashtra University) येथे आयोजित पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (Tilak Maharashtra University) येथे आयोजित पुरस्कार कार्यक्रमादरम्यान सायरस पुनावाला बोलत होते. त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक (Dr. Deepak Tilak) उपस्थित होते. त्यावेळी बोलताना पुनावाला म्हणाले की, हाफकिन इन्स्टिट्यूट (Halfkin Institute) च्या तेंव्हाच्या संचालकांनी सीरमच्या नावाबद्दल आक्षेप घेतला होता. पण आम्ही पार्टनरशिप फर्म असल्याने आमचे नाव मान्य करण्यात आले. जमीन, वीज, पाणी अशा छोट्यामोठ्या गोष्टींसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. माझ्या परिवारासह सीरमचे (serum institute of india) संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांनी हा संघर्षमय खडतर प्रवास पूर्ण केला. आज मात्र आम्हाला सर्वांकडून कौतुकाची थाप मिळते. असं ते म्हणाले.

 

पुढे बोलताना पुनावाला (Cyrus Poonawalla) म्हणाले,’ पंतप्रधान मोदींच्या काळात ब्युरोक्रॅट्सचा त्रास झाला नाही म्हणून लस लवकर मिळते.
देशातील लायसनिंग राजमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला.
आता हे प्रमाण काहीसे कमी झाल्यामुळेच आम्ही कोव्हिशिल्डचे (covishield) मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.
कोविशिल्डला परवानगी मिळण्याच्या आधीच आम्ही काही कोटी डोस तयार करण्याची रिस्क घेतली.
त्यांना जर वेळेवर परवानगी नाही मिळाली तर कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक वाया गेली असती. असे ते म्हणाले.

दरम्यान, आमच्या कुटुंबाने लस स्वस्त देऊन त्याग केला.
माझ्या उत्पन्नात खुप भर पडली असती, पण आम्ही खुप कमी किंमतीत लस दिली आहे.
आज मी जरी अब्जाधीश असलो तरी सर्वात स्वस्त लस आम्ही पुरवतो आणि माझा मुलगा आदर पुनावाला (Adar Poonawalla) ही परंपरा कायम ठेवेल असा मला विश्वास आहे.
असं सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : cyrus poonawalla praises pm modi for giving permission to vaccine licensing

Wellbeing Feeling Dizzy | चक्कर किंवा डोकं गरगरणे याकडे करू नका दुर्लक्ष, भयंकर आजारांचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Devendra Fadnavis | ‘चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालय काय म्हणाले माहित नाही’

Mumbai Sessions Court | ‘पत्नीशी जबरदस्तीनं शारिरीक संबंध बेकायदेशीर नाही; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्वाळा