अलास्का : चेक गणराज्य येथील सर्वात मोठे अब्जाधीश कॅलनर यांच्यासह 5 जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अमेरिकेच्या अलास्कातील कमी लोकसंख्येच्या ग्रामीण भागात एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात पायलटसह 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये झेक प्रजासत्ताकच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचाही समावेश आहे. त्यामुळं या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. सदर हेलिकॉप्टर हे भाड्यानं घेण्यात आल्याचं समजत आहे. एक लॉजवरून गाईड आणि काही पाहुण्यांना घेऊन जात होतं.

अलास्काच्या स्टेट ट्रूपूरनं सांगितलं की, शनिवारी ज्या लोकांचा अपघात झाला त्यात 5 जणांचा मृत्यू झाला. यात झेक प्रजासत्ताकचे अब्जाधीश पीटर केलनर (Petr Kellner) यांनी आपला जीव गमावला आहे. फोर्ब्सच्या 2020 च्या यादीनुसार त्यांच्याकडे 17 अब्ज डॉलरची संपत्ती होती. केलनर 56 वर्षांचे होते.

नेमके कोण होते पीटर केलनर ?

पीटर केलनर हे झेक प्रजासत्ताकचे सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती होते. आर्थिक, टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअरींग आणि इंशुरंस क्षेत्रातील कंपन्यांच्या पीपीएफ या समूहाचे ते मालक होते. या कंपन्यांमध्ये 94000 लोक काम करतात. झेक मीडियानं सांगितलं की, केलनर हेली स्कीइंगच्या सहलीवर गेले होते. केलनर यांनी कॉपी मशीनचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी 1991 साली पीपीएफ ग्रुपची स्थापना केली होती.