D Gang Terror Funding Case | मुंबईत NIA च्या धाडीत धक्कादायक माहिती समोर, दाऊदचा डाव उधळला ! आणखी 87 जण ‘रडार’ वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज पहाटे मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या (Underworld Don Dawood Ibrahim) डी गँग टेरर फंडिंग संबंधित (D Gang Terror Funding Case) एनआयए ने (National Investigation Agency) छापे टाकल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. एनआयएने दाऊदच्या अनेक साथीदारांवर छापे टाकले. सांताक्रूझ (Santacruz), मुंब्रा (Mumbra) , नागपाडा (Nagpada), गोरेगाव (Goregaon), भेंडी बाजार (Bhendi Bazar), बोरिवली (Borivali) येथे छापे टाकण्यात आले. दाऊदशी संबंधित अनेक हस्तक, ड्रग आणि स्मगलर आणि काही व्हाईट कॉलर प्रतिष्ठित नागरिक आहेत जे दाऊदच्या डी गँग टेरर फंडिंगचा (D Gang Terror Funding Case) भाग असल्याचा संशय एनआयएला आहे. एनआयएच्या (NIA) रडारवर आणखी 87 जण असल्याची माहिती समोर आली आहे.

 

डी गँग टेरर फंडिंग प्रकरणी (D Gang Terror Funding Case) फेब्रुवारी महिन्यामध्ये डी कंपनीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने त्याच्यावर कारवाई सुरु केली होती. दाऊदच्या शार्प शूटर सह (sharp shooter) हवाला ऑपरेटरच्या (Hawala Operators) अनेक ठिकाणावर छापे टाकले आहेत. यामध्ये रिअल इस्टेट मॅनेजमेंट (Real Estate Management) आणि गुन्हेगारी सिंडिकेटशी (Crime Syndicate) संबंधित लोकही असल्याचे बोलले जात आहे. मात्र ह्या धाडी मागचे कारण काय ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असताना आज धाडीमागचे मुख्य कारण सांगितले जात आहे ते म्हणजे टेरर फंडिंग करणारा स्लिपर सेल.

 

बॉम्बस्फोटांकरता स्लिपर सेल (Slipper Cell) तयार केले जात होते आणि त्यांच्या मार्फत बॉम्ब स्फोट घडवून आणले जायचे ही एक मोडस ऑपरेंडी (Modus Operandi) डी कंपनीची होती. मात्र आता दहशतवादी हल्ले (Terrorist Attacks) आणि बॉम्बस्फोटापेक्षा आर्थिक स्फोट (Economic Explosion) तयार करण्याच्या तयारीत डी कंपनी होती, अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. यासाठी हायप्रोफाईल लोकांचे टेरर फडिंग करणारे स्लिपर सेल डी कंपनीने तयार केले होते.

 

एनआयएने मुंबईतील आग्रीपाडा, नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार या ठिकाणी छापे टाकले. यामध्ये दाऊदच्या टेरर फंडिंग स्लिपर सेलमधील व्हाईट कॉलर व्यावसायिक तथा मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. तसेच दाऊद संबंधित अनेक हस्तक, ड्रग्ज तस्कर यांचा समावेश असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

 

टेरर फंडिंग स्लीपर सेल काय काम करायचा ?

हवाला, अंमली पदार्थ तस्करी, खंडणी (Ransom), रियल इस्टेट आणि या माध्यमातून कोट्यावधी रुपये जमा करायचे

जमा झालेल्या पैशांची विविध क्षेत्रात गुंतवणूक करायची

यासाठी प्रतिष्ठित नागरिक आणि मोठे व्यावसायिक यांचा एक टेरर फंडिंग स्लिपर सेल तयार करायचा

हा स्लिपर सेल दाऊदचा पैसा कायदेशीर मार्गाने विविध ठिकाणी गुंतवणूक करायचा

यातून पांढरा झालेला पैसा आखाती देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवायचा

हा पैशा अशा कंपन्यांमध्ये गुंतवला जात होता ज्याचा संबंध दाऊदशी आहे

 

आखाती देशात कोणत्याही गुन्ह्याची दखल न घेता उलट त्यांना सहकार्य केले जाते. तर भारतातील नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) सरकारने दाऊदची नाकाबंदी केली आहे. त्यामुळे दहशतवादी कारवाया एकाएकी बंद झाल्याने दाऊदने आता आर्थिक स्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याचे एनआयएच्या छापा कारवाईतून स्पष्ट होत आहे.

 

एनआयएने राजकीय नेता सलीम फ्रूट (Political leader Salim Fruit),
प्रतिष्ठित व्यक्ती सुहेल खंडवानी (Suhail Khandwani) आणि व्यावसायिक समीर हिंगोरा (Businessman Sameer Hingora)
यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एनआयएचा संशय खरा ठरतोय का ? अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे.
तसेच मुंबईतील 87 जण एनआयएच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे टेरर फंडिंग स्लीपर सेलची पाळंमुळं किती खोलवर पसरली आहेत हे आजच्या कारवाईवरून दिसून येते.

 

Web Title :- D Gang Terror Funding Case | d gang terror funding case shocking information in front of nia raid in mumbai 87 more on the radar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा