D. Pharmacy | डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – D. Pharmacy | भारतामध्ये शैक्षणिक वर्ष साधारणपणे जुलै, ऑगस्ट महिन्यांत सुरू होते. पण, कोरोनाने शैक्षणिक वेळापत्रकाचे कंबरडे मोडले. गेली दोन वर्षे संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही घडी पुन्हा बसवण्यासाठी एक ना अनेक प्रयत्न करत आहे. मात्र, डी. फार्मसी (D Pharmacy) अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया गेले ५ ते सहा महिने खोळंबली होती. अंततः फार्मसी कॉउन्सिल ऑफ इंडियाने प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. ( D. Pharmacy)

फार्मसी कॉउन्सिल ऑफ इंडियाच्या जाचक अटींमुळे डी फार्मसीची (D. Pharmacy) प्रवेशप्रक्रिया खोळंबली होती. फार्मसी कॉउन्सिल ऑफ इंडियाने सुविधा आणि क्षमतेच्या अटींची फेरपडताळणी करण्यास सांगितले होते. त्यामुळे जिथे प्रवेश क्षमता शंभर आहे ती घटवून पन्नास करण्यात आली होती. मात्र, ती पूर्ववत करण्यात आली आहे. आता नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जानेवारी २०२३ मध्ये होईल. तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार-

प्रवेशाची पहिली फेरी

३० नोव्हेंबर – नोंदणीची सुधारित मुदत,
१ डिसेंबर – तात्पुरती यादी जाहीर,
२ ते ४ डिसेंबर – हरकत आणि तक्रार दाखल करण्याची मुदत,
५ डिसेंबर – अंतिम गुणवत्ता यादी,
६ ते ८ डिसेंबर – पहिला कॅम्प राउंड नोंदणी,
९ डिसेंबर – कॅम्प राउंड निवड यादी जाहीर
१० ते १२ डिसेंबर – प्रवेशाची मुदत

प्रवेशाची दुसरी यादी

१३ डिसेंबर- दुसरी यादी प्रसिद्ध,
१४ ते १५ डिसेंबर दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी,
१६ डिसेंबर – दुसऱ्या फेरीसाठी निवड यादी,
१७ ते १९ डिसेंबर प्रवेश घेण्याची मुदत

Web Title :- D. Pharmacy |students can take admission between 10th to 12th december

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार

Pune Pimpri Crime | दुधिवरे खिंडीत सहलीतील विद्यार्थ्यांची बस खोल दरीत कोसळली; 3 जण गंभीर जखमी

Sanjay Raut | राज्यपालांची चहा बिस्केटे न खाता त्यांना शिवरायांच्या अपमानावर भाजप नेते प्रश्न विचारणार का? – संजय राऊत