डी. रूपा देशातील पहिल्या रेल्वे पोलीस अधिकारी 

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या पहिल्या आयपीएस अधिकारी डी. रूपा आता भारतीय रेल्वे पोलीस विभागाच्या देशातील पहिल्या महिला अधिकारी झाल्या आहेत. त्यांना कर्नाटक येथे रेल्वेच्या पोलीस महानिरीक्षकाचा पदभार सोपवण्यात आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. तेसच त्यांनी रेल्वेमध्ये प्रवास करताना कोणतीही अप्रिय घटना घडल्यास मदत करण्याचे आवाहन देखील आपल्या ट्विट मधून केले आहे.

कोण आहेत डी. रूपा
डी. रूपा कर्नाटकाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील जे. एच. दिवाकर सेवानिवृत्त अभियंता आहेत. त्या कर्नाटक कॅडरमधील २००० बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. केवळ पोलीस अधिकारी म्हणून नाही तर भरत नाट्यम् आणि हिंदूस्तानी शास्त्रीय संगितातही त्या निपुण आहेत. रूपा यांनी मनोविज्ञान शास्त्रात स्नातकोत्तर पर्यंतचे शिक्षण कुवेम्पू विद्यापीठातून पूर्ण केले. त्या ट्विटरवर सक्रिय आहेत. मागच्या वर्षी जागतिक महिला दिनाच्याच दिवशी त्यांनी महिलांसाठी प्रेरणादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

एनसीसी च्या सर्वोच्च कॅडर
डी. रूपा यांना नववीत असताना माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी ‘एनसीसी’ची सर्वोच्च कॅडर म्हणून सन्मानीतही केले आहे. त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची पदे भूषवली आहेत. बंगळुरूच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदानुक्रमे त्या दुसऱ्या सर्वात मोठ्या पोलीस अधिकारी आहेत. ‘टेड एक्स’ सारख्या प्रसिद्ध टॉक शो मध्ये त्यांनी आपले विचार मांडले आहेत. रेल्वे पोलीस अधिकाऱ्याचे पद मिळण्यापूर्वी त्या कर्नाटक वाहतुक पोलीस विभागामध्ये पोलीस महानिरीक्षक होत्या.