DSK : डी.एस. कुलकर्णी दाम्पत्यांचा तुरुंगातील फोटो व्हायरल

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

‘घराला घरपण देणारी माणसं ‘ अशी ओळख असणारे , प्रत्यक्षात मात्र ठेकेदारांची फसवणूक केलेल्या पुण्याच्या डी . एस कुलकर्णी दाम्पत्यांचे तुरुंगातील छयाचित्रे सध्या व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रात दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी या दोघांच्या हातात एक पाटी आहे ,या पाटीवर कलमे लिहिली आहेत. दोघांच्याही पाटीवर त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांच्या गुन्ह्याची नोंद आहे. आता हा फोटो प्रत्यक्ष तुरुंगातील नसून कोणीतरी ऍनिमेशन तंत्राचा वापर करून व्हायरल केल्याचे समजते आहे. फेब्रुवारी महिन्यात डीएसके दाम्पत्यांना अटक करण्यात आली .सध्या डीएसके व त्यांची पत्नी हेमंती पुण्यातील येरवडा तुरूंगात आहेत. हे फसवे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

 

संबंधित घडामोडी:

डी. एस. कुलकर्णी यांची पुणे एसआयटीकडून चौकशी सुरु

डीएसके दाम्पत्याला दिल्लीतून अटक

डीएसके घोटाळ्यातील मुख्यसुत्रधार हेमंती कुलकर्णी