खुशखबर ! फक्त 399 रुपयात ‘D2h magic स्टिक’, ‘Sony Liv – ALT Balaji’ ची सेवा ‘फ्री’, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – Tata Sky ने अमेझॉन फायर टीव्ही बरोबर पार्टनरशिप करुन Tata Sky Binge लॉन्च केल्यानंतर आता DishTV ने एक स्टीक लॉन्च केली आहे ज्यामाध्यमातून ऑनलाइन व्हिडिओ कंटेंट देखील मिळणार आहे.

399 किंमतीची D2h magic स्टिक –
डिस टीव्हीने D2h magic स्टिक लॉन्च केली आहे. याची किंमत 399 रुपये आहे. परंतू नंतर ही स्टीक 999 रुपयांना मिळणार आहे. या स्टिकला कनेक्ट करुन यूजर्स SonyLIV आणि Zee 5 पाहू शकतात. ही स्टिक वाय फाय किंवा मोबाइल इंटरनेटच्या माध्यमातून वापरली जाऊ शकते.
हे एक USB Dongle आहे. ज्याला सेट टॉप बॉक्समध्ये लावता येईल. यानंतर SonyLIV , ALT Balaji, Watcho आणि Zee 5 स्ट्रीम करता येईल. याला RF रिमोटच्या माध्यमातून कंट्रोल केले जाऊ शकते.

D2h magic स्टिक आणि Fire stick मध्ये सर्वात मोठा फरक हा आहे की Fire stick थेट टीव्हीला कनेक्ट करण्यात येते तर मॅजिक स्टिक तुमच्याकडील D2h सेट टॉप बॉक्सला लावावे लागेल.

25 रुपये सब्सक्रिप्शन चार्ज प्रति महिना –
मॅजिक स्टिक लॉन्च करत कंपनीने ऑफरची घोषणा केली. यात ग्राहक सुरुवातीला 3 महिने फ्री सेवेचा लाभ घेऊ शकतात. यानंतर प्रत्येक महिन्याला 25 रुपये सब्सक्रिप्शन चार्ज असेल. या स्टीक बरोबर एक रिमोट देखील उपलब्ध करुन देण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –