DA Arrear | 18 महिन्यापासून अडकलेल्या महागाई भत्त्याच्या एरियरचे काय होणार ? केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आली मोठी अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – DA Arrear | केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employees News) दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याची भेट मिळते. या वर्षाच्या उत्तरार्धातही लवकरच महागाई भत्ता जाहीर केला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 34 टक्के DA मिळत आहे. येत्या काही दिवसांत त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या एका वर्षात महागाई भत्त्यापासून (Dearness allowance) HRA पर्यंत मोठी सुधारणा झाली आहे. पण, 2020 ते जून 2021 पर्यंत रखडलेल्या दीड वर्षाच्या डीए थकबाकी (DA Arrear) चे काय झाले ? (7th Pay Commission DA Arrear)

 

DA Arrear : सरकारची काय आहे भूमीका

केंद्र सरकारने जुलै 2021 पासून महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ केली होती. त्यानंतर महागाई भत्त्यात दुपटीने वाढ झाली आहे. एकूण महागाई भत्ता 34 टक्क्यांवर पोहोचला आहे. परंतु, दीड वर्षे रखडल्यानंतर डीए थकबाकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की कोरोनाच्या वेळी महागाई भत्ता गोठवण्यात आला. त्यामुळे थकबाकीचा पर्याय नाही.

 

थकबाकीबाबत सरकारशी चर्चा

JCM च्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव (स्टाफ साईड) शिव गोपाल मिश्रा हे सातत्याने मागणी करत आहेत की, महागाई भत्ता बंद करण्याचा निर्णय हा सरकारचा आहे. फ्रीझ उठवल्यावर त्या काळात झालेल्या नुकसानीची भरपाईही सरकारने द्यायला हवी. दीड वर्षाच्या थकबाकीबाबत (18 Months DA Arrear) सरकारशी सातत्याने चर्चा सुरू आहे. सरकारने वाटाघाटी करून तोडगा काढावा, असे मिश्रा यांचे म्हणणे आहे.

 

11% असेल एकवेळचे पेमेंट

2021 मध्ये, 14 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, महागाई भत्त्यात एकाच वेळी 11 टक्के वाढ करण्यात आली होती. 1 जुलै 2021 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जानेवारी 2020, जून 2020, जानेवारी 2021 चा महागाई भत्ता कोरोनामुळे गोठवण्यात आला होता.

गेल्या वर्षी ही बंदी उठवल्यावर सरकारने त्याची घोषणा केली. परंतु, डीए DA Arrear वर कोणतीही चर्चा झाली नाही. आता 18 महिन्यांच्या थकबाकीवर चर्चा झाली तर त्यांना 11 टक्के एकरकमी थकबाकी दिली जाईल.

 

आणखी 4 टक्क्यांनी वाढेल महागाई भत्ता

AICPI च्या ताज्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की जुलै 2022 मध्ये देखील 4 टक्के महागाई भत्ता वाढणार आहे.
म्हणजे 7 व्या वेतन आयोगांतर्गत एकूण 34 टक्के डीए नंतर आता त्यात आणखी 4 टक्के वाढ होणार आहे.
यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा DA -DR 38 टक्क्यांवर जाईल.

कामगार मंत्रालयाची मे 2022 पर्यंतची एआयसीपीआय आकडेवारी आली आहे. ती एकूण 129 वर पोहोचली आहे.
जून 2022 ची आकडेवारी अजून येणे बाकी आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार आहे.
येत्या महिनाभरात त्याची घोषणा होऊ शकते.

 

Web Title :- DA Arrear | 7th pay commission da arrear latest update 18 months dearness allowance arrear payment option settlement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा