DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा होणार वाढ, जाणून घ्या केव्हा आणि किती रुपये वाढणार?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी भेट मिळणार आहे. केंद्र सरकार त्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. अशा स्थितीत सध्या 34 टक्के डीए घेणार्‍या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 38 टक्के होईल. (DA Hike)

वर्षात दोनदा वाढतो डीए

वास्तविक, केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करते. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI) डेटाच्या आधारे तो ठरवला जातो. AICPI चे मार्चचे आकडे आले असून त्यात वाढ झाली आहे. (DA Hike)

AICPI आकडेवारीत वाढीची अपेक्षा

मार्चमध्ये AICPI चा आकडा 126 वर गेला आहे. या वाढीच्या आधारे जुलैमध्ये महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल, मे आणि जूनचे एआयसीपीआयचे आकडे येणे बाकी असले तरी वाढती महागाई पाहता एआयसीपीआयचे आकडे आणखी वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

लाखो कर्मचार्‍यांना होणार थेट फायदा

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यातही जानेवारी 2022 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 34 टक्के डीए मिळत आहे. जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यास सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना त्याचा थेट फायदा होईल.

मीडिया रिपोर्टनुसार, महागाई भत्त्याचा पुढील हप्ता ऑगस्टच्या पगारासह मिळणे अपेक्षित आहे. मात्र, यामध्येही विलंब होऊ शकतो.

जाणून घ्या किती वाढणार पगार

मूळ वेतन 56,900 रुपये असलेल्या कर्मचार्‍यांचा डीए 38 टक्के असल्यास, त्यांच्या पगारात दरमहा 2,276 रुपयांची वाढ होईल, जी वार्षिक 27,132 रुपये होईल.

त्याचप्रमाणे 18 हजार मूळ वेतन असलेल्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता दरमहा 720 रुपयांनी वाढणार असून तो वार्षिक 8,640 रुपये होईल.

Web Title : DA Hike | 7th pay commission dearness allowance will increase again know central govt employees da hike latest news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन