home page top 1

मंत्र्याची मुलगी, पोलिस उपायुक्‍तांची पत्नी असलेल्या डॉ. ममतांची पर्स चोरट्यानं लांबवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दबंग अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पत्नीची पर्स सीएसएमटी परिसरात असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथून चोरीला गेली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. हा प्रकार शनिवारी घडला असून याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स चोरीला गेल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासून चोरट्याचा शोध सुरु केला.

शिवदीप लांडे हे अंमली पदार्थ विरोधी विभागाचे उपायुक्त म्हणून कार्य़रत आहेत. त्यांनी पाटणाचे पोलीस अधिकारी असताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने त्यांची दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख झाली आहे. त्यांची पत्नी डॉ. ममता शिवतारे-लांडे या गणपती उत्सवानिमित्त क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी असलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पर्सवर डल्ला मारला.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रॉफर्ड मार्केटमधील बादशाह ज्यूस सेंटरजवळ असलेल्या शेख मेनन लेनमध्ये अज्ञात चोरट्यांनी भांडणाचे नाटक करून ममता यांची पर्स चोरून नेली. ममता या स्त्रीरोग तज्ज्ञ असून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या कन्या आहेत. चोरीस गेलेल्य पर्समध्ये त्यांचे ओळखपत्र, पॅन कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि दोन हजार रुपये होते.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like