Post_Banner_Top

‘दबंग’ सलमान खान करणार ‘या’ मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या मुलीला लॉंच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाईजान सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा भारतमुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाणेही रिलीज करण्यात आले आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. सलमान खान हवं त्याला बॉलिवूडमध्ये लॉंच करत आला आहे. अनेकांना त्याने ब्रेक दिला आहे. सध्या सलमान खान दबंग 3 या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रींना संधी देणाऱ्या भाईजानने आपल्या सिनेमामतून यावेळी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला संधी दिली आहे.

ही अभिनेत्री म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कन्या अश्वमी मांजेरकर ही आहे. दबंद 3 या सिनेमातून अश्वमी बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. महेश मांजरेकर आणि सलमान खान यांची चांगली मैत्री आहे. त्यांनी अनेकदा एकत्र काम केले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या सिनेमाच्या निमित्ताने अश्वमीला थेट सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळत आहे. सलमान खान अश्वमीचा जीव वाचवतानाचे एक दृश्य या सिनेमात दिसणार आहे. त्यात अश्वमी सलमान सोबत दिसणार आहे. सलमान खानच्या धमाकेदार एन्ट्रीवेळी अश्वमीही सिनेमा दिसणार आहे.

या सिनेमात दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा ही पुन्हा एकदा सलमान खानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मौनी रॉय ही देखील एका गाण्यामधून या सिनेमात दिसणार आहे. येत्या डिसेंबर मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रभूदेवा या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

Loading...
You might also like