दबंग 3 पोस्टर : समोर आली रज्जो तर ‘भाईजान’ सलमान म्हणाला – ‘ये हैं हमारी हबीबी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दबंग 3 या सलमान खानच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहताहेत. चित्रपटाचे ट्रेलर येण्यासाठी अजून दोन दिवस बाकी असताना सलमान खानाने आपल्या या चित्रपटाचे प्रमोशन देखील सुरु केले आहे. याबाबत सलमान खान ने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हाबाबत भाष्य करण्यात आले आहे.

या व्हिडिओमध्ये सलमान खान सोनाक्षी सिन्हाच्या पोस्टर जवळ थांबून म्हणतो, ही आहे आमची सुपर सेक्सी रज्जो, अजूनही आमची हबीबी (पत्नी). या आधी सलमान खानाने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते. तसेच यावेळी सलमानने आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे ती म्हणजे ईद 2020 ला सलमानचा राधे नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2009 मध्ये आलेल्या वॉन्टेड चित्रपटाचा हा दुसरा भाग असणार आहे. याचे दिग्दर्शन देखील प्रभू देवाचं करत आहे.

पूर्ण झाले आहे दबंग 3 चे चित्रीकरण
दबंग 3 चे चित्रीकरण पूर्ण झाले असून येत्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. देशभरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे.दबंगच्या या आधीच्या दोनीही सिनेमांनी शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई केलेली आहे.

सलमान खान ने आपल्या सोशल मीडिया वरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये दबंगमधील सर्व कलाकार दिसत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे सांगत दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांची देखील आठवण यावेळी सलमान ने काढली होती.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like