शूटिंग सुरू होताच ‘दबंग ३’ चे टायटल ट्रॅकचा व्हिडिओ लीक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानचा पहिल्यापासूनच मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेहमी हिट ठरतो. त्याचे चाहते आगामी चित्रपटात सलमानला पुन्हा बघण्यास फारच उत्सुक असतात. येणारा चित्रपट ‘दबंग ३’ च्या शुटींग मध्ये तो खुप व्यस्त आहे. त्याच्या शुटिंग दरम्यान चा टायटल ट्रॅकचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ ने चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटाचे गीत मध्यप्रदेश मध्ये शुट केले आहे.

या गाण्याच्या शुटिंग दरम्यान सलमानने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची डेनिम घातलेली व्हिडिओमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये सलमान अत्यंत वेगळ्या अंदाजात दिसत आहे. याआधी देखिल अनेक डान्स स्टेप्सने चाहत्यांना अगदी वेड लावले होते. आता अशाच काही खास स्टेप्स पुन्हा चाहत्यांना व्हिडिओमधून पहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/Bvx-grfDtU2/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bvx-grfDtU2/?utm_source=ig_embed

शुटिंग मध्ये सलमान खान तब्बल ५०० बॅकग्राऊंड डान्सर्स साेबत नाचताना दिसत आहे. या शीर्षकगीताचे चित्रीकरण मध्य प्रदेशमध्ये झाले असून हे गाणे शूट करण्यासाठी १३ दिवसांचा कालावधी लागला आहे. ‘दबंग ३’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार असून तसेच चित्रपटात सलमान खान सह अरबाज खान आणि सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. सोनाक्षीने ‘दबंग’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘दबंग २’ मध्येही ती दिसली. आता ‘दबंग ३’ मध्येही सोनाक्षी चा अनोखा जलवा तिच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे.