‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा डोनेशनमुळं ‘ट्रोल’ ! नेटकऱ्यांना दिलं जोरादार ‘प्रत्युत्तर’

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाशी दोन हात करण्यासाठी बॉलिवूडपासून तर टॉलिवूडपर्यंत प्रत्येक कलाकारानं पीएम केअर्स फंडात डोनेशन दिलं आहे. अलीकडेच अनेक कलाकार डोनेशन न दिल्यानं ट्रोलिंगचे शिकार होताना दिसले. सोनाक्षी सिन्हालाही नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. यावर तिनं साऱ्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

https://twitter.com/sonakshisinha/status/1244998693465378821

लोकांचं म्हणणं होतं की, बिग बी अमिताभ बच्चनप्रमाणे सोनाक्षी सिन्हानंही पीएम रिलीफ फंडात कोणतंही दान दिलेलं नाही. तिनं गरीबांची मदत केल नाही असंही त्यांना वाटलं. तिनं कोणत्याही संस्थेला मदत केली नाही असं त्यांचं म्हणणं होतं. सोशलवर जेव्हा सोनाक्षीनं स्वत:ला टॅग होताना पाहिलं तेव्हा तिनं ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

सोनाक्षीनं एका हिंदी वाकप्रचाराचा वापर करत ट्विट केलं आहे. सोनाक्षीनं लिहिलं की, “मला हे सांगायचं आहे तर मी डोनेशनबद्दल सांगत नसेल तर याचा अर्थ असा नाही की, मी दान केलं नाही. नेकी कर दरिया में डाल, हे एकलंच असेल? काही लोक खरंच याला फॉलो करतात. आता शांत व्हा आणि आपला वेळ चांगलं काम करण्यात खर्च करा.” सोनाक्षीनं दिलेलं उत्तर काही चाहत्यांना आवडलं आहे. सध्या सोनाक्षीचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.