मुलाच्या जामिनासाठी आईची पोलीस अधिकाऱ्यावर दबंगगिरी

वाकड  : पोलीसनामा ऑनलाइन

पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव मध्ये मुलाच्या जामिनासाठी पोलीस अधिकाऱ्याला आईने धमकावल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१६) थेरगाव येथे सहाच्या सुमारास घडली आहे.आरोपीला मारहाणीच्या प्रकरणात वाकड पोलिसांनी अटक केली आहे.त्यासाठीच आरोपीच्या आईने थेट पोलीस चौकी गाठत मुलाला जामीन मिळावा यासाठी पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करत धमकी दिली.

शैला रमेश तिवारी आणि नंदू बारणे अस संशयित आरोपींचे नावे आहेत.आर,एम केंगार पोलीस उपनिरीक्षक यांनी याप्रकरणी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मारहाण प्रकरणी अक्षय तिवारी याला वाकड पोलिसांनी अटक आहे.याचाच राग मनात धरून आरोपीच्या आईने थेट पोलीस चौकीत जाऊन पोलीस अधिकारी केंगार यांना अर्वाच्च भाषा वापरून उद्धट वर्तन करून अरेरावी केली.फिर्यादी पोलीस अधिकारी समजूत काढत असताना आरोपीची आई ही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन माझ्या मुलाचा जामीन झालाच पाहिजे नाही तर बघून घेईल अशी धमकी दिली. तर इतर मोबाईल धारक इसमाने फिर्यादी यांना फोनवरून तुमची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करतो अशी देखील धमकी दिली आहे.अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.