‘भूमी’नंतर ‘कियारा’चा ‘NUDE’ फोटो व्हायरल ! सनी लिओनी, अनन्या पांडेनंही काढले ‘असे’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील अनेक अ‍ॅक्ट्रेस प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशुट करत असतात. त्याला सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डब्बू रतनानीच्या प्रत्येक फोटोमध्ये बॉलिवूड स्टार्सचा एक वेगळा अंदाज समोर येताना दिसतो. त्याच्या फोटोशुटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असते. डब्बू प्रत्येक वर्षी आपल्या फोटोशुटमध्ये कोणत्या ना कोणत्या अ‍ॅक्ट्रेसला न्यूड किंवा टॉपलेस करतच असतो. आलिया भट पासून तर कॅटरीना कैफपर्यंत सर्वांनीच डब्बूसाठी हॉट फोटोशुट केलं आहे.

नुकताच भूमी पेडणेकरचा बाथटबमधील फोटो समोर आला होता. या फोटोत ती न्यूड दिसत होती. डब्बू रतनानीच्या कॅलेंडर फोटोशुटसाठीच तिनं हा फोटो काढला होता. सध्या भूमीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवणी, सनी लिओनी, अनन्या पांडे आणि कृती सेनन यांचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात अभिनेत्री न्यूड दिसत आहेत. डब्बू रतनानीच्या 2020 च्या कॅलेंडरसाठी त्यांनी हे फोटोशुट केलं आहे. सध्या या फोटोंची सोशलवर जास्त चर्चा होताना दिसत आहे.

या सगळ्यात कियारा आडवाणीनं विशेष लक्ष वेधलं आहे. कारण कियारा पूर्णपणे न्यूड झाली आहे. कियारानं आपली अप्पर बॉडी एक झाडाच्या मोठ्या पानानं कवर केली आहे. कियारा कमालीची बोल्ड आणि हॉट दिसत आहे. सध्या कियाराचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

आजपर्यंत बॉलिवूड स्टार सनी लिओनी, विद्या बालन, कृती सेनन, सोफी चौधरी, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पाटनी, श्रद्धा कपूर, परिणिती चोपडा, दीपिका पादुकोण अशा अनेक अभिनेत्रांना टॉपलेस होण्यासाठी डब्बूनं मनवलं आहे.