डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : अमोल काळेला 14 सप्टेंबर पर्यंत कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळेला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात वर्ग करून घेवुन पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. 14 सप्टेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. कर्नाटकच्या राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) अमोल काळेचा ताबा सीआयने घेतला होता.
डॉ. दाभोलकर हत्याकांडात अमोल काळेचा समावेश असल्याचा संशय सीबीआयला आहे.
जाहिरात

डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित सचिन अंदुरे आणि काळे यांची औरंगाबादमध्ये भेट झाली होती. त्यावेळी अमोल हा औरंगाबाद येथील लॉजवर राहिला होता. काळेने अंदुरेला पिस्तुल दिले होते. यापुर्वी डॉ. दाभोलकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकर, राजेश बांगेरा आणि अमित गिवेकर यांना दि. 10 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या सचिन अंदुरे हा न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे अंदुरे आणि अमोल काळे यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी सीबीआय न्यायालयाकडे परवानगी मागण्याची शक्यता आहे. अमोल काळेला डॉ. दाभोलकर हत्ये प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर आणखी काही धक्‍कादायक गोष्टी समोर येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, अमोल काळेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय परिसरात गर्दी झाली होती. यापुर्वी डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्यांकडे देखील सीबीआय सखोल चौकशी करीत आहे.

[amazon_link asins=’B01FXJI1OY,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4534476d-b1ae-11e8-b6bb-adf8b687a336′]