दाभोलकर हत्याकांडातील दुचाकीची बीडमध्ये विल्हेवाट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

जळगावच्या साकळीमधून अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी (वय २९) आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उर्फ भैया लोधी (वय ३२) यांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान वापरलेल्या दुचाकीची बीडमध्ये कटरच्या साहाय्याने विल्हेवाट लावल्याचा एटीएसला संशय आहे.

[amazon_link asins=’B01M8L9AML,B01L7688JU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c91af879-baf2-11e8-9f0e-63a7c49c37b2′]

नालासोपारा शस्त्रसाठ्या प्रकरणी शरद कळसकर याच्याकडून एटीएसने ५ दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यातील ३ दुचाकी कर्नाटक तर २ दुचाकी दोघांनी महाराष्ट्रातून चोरी केल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे.

३ गावठी बॉम्ब, सीडी, तसेच अन्य दस्ताऐवजांसहीत लोधी आणि सूर्यवंशीला एटीएसने बेड्या ठोकल्या होत्या. त्यांची कोठडी संपत असल्याने सोमवारी त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सूर्यवंशीने अन्य एक दुचाकी बीडमध्ये कटरच्या साहाय्याने नष्ट केली. दाभोलकर हत्याकांडात वापरलेली ही दुचाकी असल्याचा संशय एटीएसला आहे. दोघेही नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने दोघांच्या कोठडीत २५ तारखेपर्यंत वाढ केली आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : हत्येवेळी मारेकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी दोघे उपस्थित होते : सीबीआय