चंबलच्या दरोडेखोरासोबत झालं ‘प्रेम’, अनेक ठिकाणी ‘राज’ केल्यानंतर ‘जाळ्यात’ अडकली ‘ही’ सुंदरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण पसरवणारी डाकू साधना पटेल अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे. साधना पटेल हीच्यावर दोन्ही राज्यात दरोडेखोरी आणि अपहरणाची प्रकरणं आहेत आणि तिच्यावर 20 – 20 हजारांचे बक्षीस लावण्यात आले होते.

सतना पोलिसांनी साधना पटेलला कुरियनच्या जंगलात ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून पोलिसांना 315 ची देशी बंदूक आणि 4 जिवंत काडतूसे ताब्यात घेण्यात आली आहेत. डाकू साधना पटेल ना की फक्त या कारणामुळे चर्चेत होती तर प्रेमसंबंधांमुळे देखील ती लोकांमध्ये चर्चेत होती. डाकू साधना पटेलने दोन विवाह केले होते परंतू दोन्ही विवाह अपयशी ठरल्याने ती आपल्याच टोळीतल्या एका डाकूच्या प्रेमात पडली.

साधना पटेलच्या घरच्यांनी तिचे लग्न वयाच्या 17 व्या वर्षीच भरतकूपच्या एका गावात लावून दिले होते परंतू 6 महिन्यात साधनाने त्याचा नवरा सोडला. यानंतर साधनाने दुसरे लग्न लावून दिले परंतू तिच्या मर्जीने केलेले तिचा विवाह टिकू शकला नाही. त्यानंतर ती बंदूक घेऊन जंगलात उतरली.

साधनाच्या वडीलांवर पहिल्यापासूनच डाकूंचे संघटन करण्याचा आरोप होते आणि त्यांच्या घरी डाकू येत जात होते. त्यामुळे लहानपणापासून साधनाची डाकूंबरोबर ओळख होती. ज्याचा फायदा घेत तिने आपले वडील गेल्यानंतर डाकू नवल धोबीच्या टोळीत प्रवेश केला.

साधनाच्या अटकेसंबंधित पोलीस अधीक्षक रियाज इकबाल यांनी सांगितले की सताना जिल्ह्यात या वर्षी तीन डाकूंच्या टोळ्या सहभागी होत्या. एक बबली कोलची, दुसरी साधना पटेलची आणि तिसरी गौरी यादवची. यातील दोन टोळ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त केला होता.

बबली या डाकूचा काही महिन्यापूर्वीच एनकाऊंटर करण्यात आला त्यानंतर साधनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तिसऱ्या टोळीचा देखील बंदोबस्त केला. मागील 1 महिन्यात या टोळूत दोन मुख्य सदस्य रिंकू शिवहरे आणि दिपक शिवहरे यांना ताब्यात घेण्यात आले होते, हे दोघे शॉर्प शूटर आहेत.

Visit : Policenama.com