Dada Bhuse | बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोराला मंत्री दादा भुसेंनी पकडले, नंतर पोलिसांच्या केले स्वाधीन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – दरोडा (Robbery) टाकण्यासाठी पिस्तूल (Pistol) घेऊन बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पकडले. त्यानंतर, सहकार्‍यांच्या मदतीने स्थानिक पोलिसांच्या स्वाधीनही केले. मालेगावच्या कलेक्टर पट्टा (Collector Patta Malegaon) भागात ही घटना घडली. दरोडेखोराला पकडल्यानंतर भुसे (Dada Bhuse) यांनी त्याला अनेक प्रश्न विचारून माहिती घेण्याचाही प्रयत्न केला. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 

दरोड टाकण्याच्या उद्देशाने दोन-तीनजण कलेक्टर पट्टा भागात भरदिवसा आले होते. हे दरोडेखोर एका बंगल्यात शिरल्याचे समजताच तिथे आलेल्या दादा भुसे (Dada Bhuse) यांनी धाडस दाखवून त्यातील एका पिस्तुलधारी दरोडेखोराला पकडले. मंत्री भुसेंनी दाखवलेल्या धाडसामुळे बंगल्यातील 3 महिलांचा जीव वाचला. नंतर या दरोडेखोराला पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) असल्याने बंगल्यात दागिने, रोख रक्कम भरपूर असेल या अंदाजाने एक चोरटा दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हातात पिस्तूल घेऊन दोषी यांच्या बंगल्यात घुसला.
घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून त्याने दागिन्यांची मागणी केली.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा केला.

महिलांचा आवाज ऐकून नागरिक बंगल्याकडे धाव घेतली. त्याच या परिसरात पालकमंत्री दादा भुसे देखील आले होते.
त्यांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले आणि चोरट्याला शरण येण्याचे आवाहन केले.
तब्बल दोन तासानंतर लपलेला चोरटा शरण आला त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

यावेळी दादा भुसेंनी चोरट्याला दमही भरला. तुझ्यासोबत असलेले दोन-तीन जण कोण होते, त्यांची नावे सांग, असे म्हटले.
त्यावर, मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणीही नाही, असे उत्तर चोरट्याने दिले. मात्र, दादा भुसेंनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

Web Title :- Dada Bhuse | minister dada bhuses brave arrow the robber was caught and handed over to the police in malegaon nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | ‘दगडाला पाझर फुटला नाही, म्हणूनच…’, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Nana Patole | मुख्यमंत्र्यांचे नाना पटोलेंना खोचक प्रत्युत्तर, म्हणाले – ही मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…

WhatsApp Down | तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सॲप डाऊन, ग्रुप्सवर मेसेजिंग थांबलं!