नाशिकमध्ये शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांची पोलिसांवर दादागिरी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – निफाडचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाले. आमदार अनिल कदम यांनी पोलिसांवर आपण आमदार असल्याचा रुबाब दाखवत पोलिसांवर दादागिरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस रिक्षा चालकावर कारवाई करत असताना आमदरांच्या कार्यकर्ता त्याचा व्हिडीओ काढत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला विरोध केला यावरून हा वाद झाला.

पोलीस रिक्षा चालकांवर कारवाई करत असताना आमदार अनिल कदम यांच्या कार्यकर्ता पोलिसांचा व्हिडीओ काढत होता. त्यावेळी त्याला विरोध केल्यामुळे आमदार कदम यांनी पोलिसांना अरे तुरेची भाषा वापरत पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पृथ्वी गोल आहे. भेट होईल, तुला उचलून टाकेन अशा भाषेत अनिल कदम यांनी दमदाटी केली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पोलीस आमदार देशमुख यांना समजावून सांगत असताना पोलिसांची कॉलर पकडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

राज्यात पोलिसांवर कारवाई दरम्यान हल्ले होत आहेत. पोलिसांना शिवीगाळ करण्यात येते. जर लोकप्रतिनीधीच जर अशा पद्धतीने वागत असतील तर पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांमध्ये आणि लोकप्रतिनीधींमध्ये काय फरक राहीला. ज्यांनी पोलिसांच्या बाजूने उभे रहायला हेवे तेच पोलिसांना दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहेत.