उद्यापासून धावणार दादर-सावंतवाडी ‘तुतारी’ एक्स्प्रेस !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली कोकणसाठीची दादर-सावंतवाडी-दादर तुतारी विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. 31 ऑक्टोबपर्यंत त्याचे पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

रेल्वे 1 नोव्हेंबरपासून पावसाळी वेळापत्रकाऐवजी नियमितपणे धावणार आहे. त्यामुळे वेळेत काहीसा बदल होत असल्याची माहिती मध्य रेल्वे व कोकण रेल्वेने दिली. 24 सप्टेंबरपासून या गाडीचे आरक्षण उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे . केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाडयांमधून प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. राज्यांतर्गत धावणारी ही दुसरी गाडी आहे. याआधी सीएसएमटी-मनमाड गाडी सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 01003 दादरहून दररोज 05 वाजता 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुटणार आहे .आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी दुपारी 12.20 वाजता पोहोचणार आहे . गाडी क्रमांक 01004 सावंतवाडी रोड येथून दररोज सायं 5.30 वाजता 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबपर्यंत सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दादरला पहाटे 06.45 वाजता पोहोणार आहे. त्यादरम्यान, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ थांब्यावर गाडी थांबणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like