भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा ‘असा’ बनला ‘राजा हरिश्चंद्र’!

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चित्रपटसृष्टीची चंदेरी दुनियाची त्याचबरोबर चित्रनगरी फिल्मसिटीची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासोहब फाळके त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० साली झाला. यांची आज १४९ वी जयंती निमित्त अनेकांनी आदरांजली व्यक्त करण्यात आली. त्यांनी ३१ वर्ष चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान दिले आहे.

दादासाहेब फाळके यांची कहाणी स्वप्नांचा ध्यास घेणाऱ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे. त्यांचे निधन नाशिक मध्ये १६ फेब्रुवारी १९४४ साली झाले. त्यांच्या निधनानंतर १९७० सालापासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षीपासून दादासाहेब फाळके यांच्या पुरस्काराची सुरुवात झाली.

दादासाहेब फाळके यांनी एकूण ४७ सिनेमांची निर्मिती केली. ‘ गंगावतरण’ हा त्यांनी पहिला सिनेमा बनविला. त्यांच्या आयु्ष्यावर हरिश्चचंद्राची फॅक्टरी हा सिनेमा २०१० साली आला. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यांचे पुर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके आहे. त्यानी चित्रपट विषयावर अजून जास्त माहिती मिळविण्यासाठी ते लंडन ला गेले.

तिथे त्यांनी चित्रपटसृष्टीची पुर्ण माहिती मिळविली. सर्व माहिती मिळविल्यानंतर सर्व लागणारे साधन अखेर त्यांनी विकत घेतले. १ एप्रिल १९१२ साली दादासाहेब फाळके यांनी ‘फाळके फिल्म’ ची निर्मिती केली. त्यांनी पहिला ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला मुकपट बनवला. त्यांनी लेखन, संवाद, दिग्दर्शन ही जबाबदारी सांभाळली व नंतर सिनेमा तयार केला.