2021 मध्ये सुशांतला मिळणार दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ‘अवॉर्ड’

मुंबई : बॉलीवुड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. सुशांतचे कुटुंब, मित्र आणि फॅन्स अजूनही या अभिनेत्याच्या आठवणीतून बाहेर आलेले नाहीत. सुशांतवर प्रेम करणार्‍या सर्वांना त्याला न्याय मिळताना पहायचे आहे. दरम्यान, दिवंगत बॉलीवुड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूतला 2021 मध्ये होणार्‍या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दादासाहेब फाळके अवॉर्डने सन्मानित केले जाईल. सुशांतला या अवार्डने सन्मानित करण्याची घोषणा केली गेली आहे.

बॉलीवुडमध्ये प्रत्येकाचे स्वप्न असते की, त्यांना आयुष्यात एकदातरी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जावे. दिवंगत बॉलीवुड अ‍ॅक्टर सुशांत सिंह राजपूत यास हे अवार्ड देण्यात येणार आहे. सुशांत सिंह राजपूतला दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड पुढील वर्षी 2021 मध्ये दिले जाईल. दादासाहेब फाळके अवॉडने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर याबाबतीची घोषणा केली आहे. मात्र, अजूनपर्यंत अवॉर्डची तारीख समोर आलेली नाही. दुर्दैवाने हे अवार्ड घेण्यासाठी सुशांत या जगात नाही. त्याचे हे अवार्ड त्याच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती स्वीकारेल.

दादा साहेब फाळके अवॉर्डने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट करून लिहिले आहे की – दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डने 2021 मध्ये सुशांत सिंह राजपूतला सन्मानित केले जाईल.

अमेरिकेत सुशांतला मिळाला सन्मान
सुशांत सिंह राजपूतला सुमारे एक आठवड्यापूर्वी कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीमध्ये सुद्धा सन्मान मिळाला आहे. सुशांतला हा सन्मान त्याच्या जग आणि सिनेमा यासाठी दिलेल्या चांगल्या योगदानासाठी मिळाला आहे. बहिण श्वेता सिंहने हा सन्मान स्वीकारला.

सुशांतला सरकारकडून मिळू शकतो पुरस्कार?
सुशांत सिंह राजपूता भारतात सुद्धा सन्मानित केले जाऊ शकते. चर्चा आहे की, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारात सुशांतला खास पद्धतीने सन्मानित करू शकते. मात्र, यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.